चाैकशी समिती नेमताच अर्धवट कामांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:23 AM2021-06-28T04:23:21+5:302021-06-28T04:23:21+5:30

चिखली शहरातील संभाजीनगरमधील संत सेना भवनासह दहा ते बारा भूखंडांचे सौंदर्यीकरण करण्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे; परंतु त्याची ...

Partial work started as soon as the committee was appointed | चाैकशी समिती नेमताच अर्धवट कामांना सुरुवात

चाैकशी समिती नेमताच अर्धवट कामांना सुरुवात

Next

चिखली शहरातील संभाजीनगरमधील संत सेना भवनासह दहा ते बारा भूखंडांचे सौंदर्यीकरण करण्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे; परंतु त्याची बिले अगोदरच काढण्यात आली आहेत. या प्रकरणी अनेक तक्रारी झाल्यानंतर प्रशासनाने चाैकशी समिती स्थापन केली आहे. या समितीने पंचनामेदेखील केले आहेत. या समितीने पाहणी करण्यापूर्वीच अगोदर न लावलेले दिवे लावण्यात आले आहेत. संत सेना महाराज भवन येथे स्ट्रॉबेरीची झाडे लावण्याचे क्रमदेखील नगरपालिका प्रशासनाच्या ठेकेदाराने लेखी दिले आहेत. प्रत्यक्षात येथे स्ट्रॉबेरीचे एकही झाड लावण्यात आलेले नाही. जिजाऊ उद्यानात एका रात्री दिवे लावण्यात आल्यामुळे हा भाग प्रकाशमय झाला. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मयूर बोर्डे, राणा चंदन व कार्यकर्त्यांनी शासनाकडे केली आहे.

Web Title: Partial work started as soon as the committee was appointed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.