प्रवाशांना वाटत नाही बसस्थानक सुरक्षित

By admin | Published: April 15, 2015 12:52 AM2015-04-15T00:52:32+5:302015-04-15T00:52:32+5:30

लोकमत सर्वेक्षण; प्रवाशांना वाहकांचे सहकार्य नाही.

Passengers do not believe the bus station is safe | प्रवाशांना वाटत नाही बसस्थानक सुरक्षित

प्रवाशांना वाटत नाही बसस्थानक सुरक्षित

Next

बुलडाणा : परीक्षा संपल्यामुळे परिसरातील शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे इतर गावाला जाण्यासाठी प्रवाशांच्या संख्येत उल्लेखनीय वाढ झाली आहे. प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहता राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सोयी- सुविधा पुरवणे आवश्यक आहे; परंतु या सेवा पुरविण्यात एसटी महामंडळ प्रशासन अपयशी ठरल्याचे रविवारी लोकमतने प्रवाशांची मतं जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले. तर वाढत्या भुरट्या चोर्‍या, पाकिटे बेपत्ता होणे अशा विविध कारणामुळे बसस्थानक परिसर असुरक्षित असून, विविध सुविधांचा अभाव असल्यामुळे वाहक सहकार्य करीत नसल्याचे दिसून आले. सुट्यांमुळे बसने प्रवास करणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ पाहता राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यात येतात का, या अनुषंगाने ह्यलोकमतह्णने सोमवारी सर्वेक्षण केले. सर्वेक्षणादरम्यान बुलडाणा बसस्थानकावरील सोयी- सुविधांबाबत प्रवाशांचे मत जाणून घेतले. यावेळी राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांना पुरविण्यात येणार्‍या सोयी-सुविधांचे वास्तव समोर आले. बसने प्रवास करणे किती सुरक्षित आहे, याबाबत विचारणा केली असता, ६५ टक्के प्रवाशांनी एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याचे सांगितले. असे असले तरी, २0 टक्के प्रवाशांना एसटीचा प्रवास असुरक्षित वाटतो. आपत्कालीन परिस्थितीत बसमध्ये प्रथमोपचार सुविधा मिळत नसल्याचे ७0 टक्के प्रवाशांनी, तर बसची स्थिती पाहून प्रथमोपचार सुविधेबाबत विचारणाच केली नसल्याचे २0 टक्के प्रवाशांनी सांगितले. या व्यतिरिक्त बसस्थानकावर उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत विचारले अस ता ५0 टक्के प्रवाशांनी समाधानी नसल्याचे सांगितले. प्रवाशांना पुरवण्यात येणार्‍या सुविधा व सुरक्षेच्या बाबतीत राज्य परिवहन महामंडळ किती सज्ज आहे, हे भीषण वास्तव लोकमतच्या सर्वेक्षणातून समोर आले. शौचालयाची व्यवस्था सोडली तर बुलडाणा बसस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी दुसर्‍या कोणत्याही सुविधा नाहीत.

Web Title: Passengers do not believe the bus station is safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.