बस बायपास मार्गाने जात असल्याने प्रवासी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:22 AM2021-02-22T04:22:59+5:302021-02-22T04:22:59+5:30
येथील नवीन बसस्थानकाचे काम संथगतीने सुरू आहे. या बांधकामामुळे बसस्थानकाच्या मागील सोनाटी रस्त्यावर प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. ...
येथील नवीन बसस्थानकाचे काम संथगतीने सुरू आहे. या बांधकामामुळे बसस्थानकाच्या मागील सोनाटी रस्त्यावर प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी सर्वत्र कचरा व अस्वच्छता पसरलेली दिसून येत आहे. सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र या बसस्थानकावर कुठल्याच नियमाचे पालन होताना दिसत नाही. या बसस्थानकावरून बुलडाणा, जालना, लोणार, आदी गावांना जाण्यासाठी एस.टी. बस शहरातून बसस्टॉपच्या ठिकाणी उभ्या असलेल्या प्रवाशांना घेत होती. मात्र आता एस.टी. बस परस्पर सोनाटी बायपास मार्गाने जात असल्याने शहरात इतर बसस्टॉपच्या ठिकाणी असलेले प्रवाशी ताटकळत बसतात. मेहकर येथे पोलीस ठाण्यासमोर व लोणार वेस येथे अनेक प्रवासी थांबतात. बस बायपास मार्गाने जात असल्याने प्रवाशांना बसची प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक त्रासही सहन करावा लागत आहे. त्यामुळे एस.टी.च्या उत्पन्नावरही परिणाम होत आहे. अवैध वाहतूकही जोमात सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गंभीरतेने लक्ष घालण्याची गरज आहे.