बसमध्ये प्रवाशांना उघडाव्या लागतात छत्र्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 14:52 IST2019-08-06T14:52:32+5:302019-08-06T14:52:51+5:30
मलकापूर : पावसाळ्यात प्रवास करताना गळतीमुळे चक्क छत्र्या घ्याव्या लागतात.

बसमध्ये प्रवाशांना उघडाव्या लागतात छत्र्या
- हनुमान जगताप
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : पावसाळ्यात प्रवास करताना गळतीमुळे चक्क छत्र्या घ्याव्या लागतात. हा अनुभव मलकापूर आगारातील एका बसमध्ये प्रवास करताना आज अनेकांनी अनुभवला. यावरून महामंडळाचा ढिसाळपणा अधोरेखित होतो.
राज्य परिवहन महामंडळाच्या मलकापूर आगारातील बस क्र. एम.एच. ४०/एन.८१०० हि गाडी मलकापूर वरून कोली गवळी कडे आज सोमवारी दुपारी ४ वा: निघाली असताना थोडयाच वेळाने पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पावसाचा जोर वाढला. त्यामुळे प्रवाशांना चक्क छत्र्या उघडाव्या लागल्या. ज्यांच्याकडे होत्या त्यांच ठिक पण ज्यांच्या छत्र्या नव्हत्या त्यांची अक्षरश: तारांबळ उडाली होती.
या प्रकारामुळे प्रवाशी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आगाराच्या वतीने सावरा सावर करण्यात आली आहे. मात्र राज्य परिवहन मंडळाचा ढिसाळपणा त्यावरून अधोरेखित झाला आहे.
आगारातील जुन्या बसेसच्या टपावर आम्ही प्लास्टिक लावले होते आता पाऊस वाढल्याने कदाचित ते फाटून गळती झाली असेल.त्याची करून कारवाई करण्यात येईल.
- श्रीराम दराडे
आगारप्रमुख मलकापूर