आंदोलनामुळे पशुपालक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:31 AM2021-07-26T04:31:01+5:302021-07-26T04:31:01+5:30
बैलजोडी व शेतमजुरांअभावी खोळंबा चिखली: सध्या सर्वत्रच शेतीतील कामांनी वेग घेतला असल्याने ऐन वेळी शेतमजूर मिळत नाहीत, त्यातच मजुरीच्या ...
बैलजोडी व शेतमजुरांअभावी खोळंबा
चिखली: सध्या सर्वत्रच शेतीतील कामांनी वेग घेतला असल्याने ऐन वेळी शेतमजूर मिळत नाहीत, त्यातच मजुरीच्या दरातही वाढ झालेली आहे. चाराटंचाई, गुराख्यांची वाणवा व आधुनिक पद्धतीच्या शेतीमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील बैलजोडी विकून टाकली आहे. काही मोजक्या शेतकऱ्यांनीच आता खुट्यावर बैल असावेत, या भावनेतून बैलजोडी राखून ठेवली आहे. पर्यायाने अनेक शेतकऱ्यांची कामे रखडलेली आहेत.
ऑनलाइन कामे प्रभावित
मोताळा: गत काही दिवसांपासून तालुक्यातील नागरिकांना मोबाइल रेंजच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराने ऑनलाइन शिक्षण, आरोग्य, शेती आदी सर्वच बाबींच्या सुविधा प्रभावित झाल्या आहेत. तथापि कॉलड्रॉप होणे व नेटवर्क गायब होणे, या बाबी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
शेतकरी कृषी स्वावलंबनापासून वंचित
देऊळगाव राजा: तालुक्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सिंचन योजनेंतर्गत सिंचन योजनेसाठी एकूण ६५ गावांपैकी ५४ गावे वगळण्यात आलेली आहेत. त्यामुळे या गावातील शेकडो शेतकरी सिंचनाचा लाभ घेण्यापासून वंचित राहणार असल्याचे दिसून येते.
स्मार्ट कॉटन प्रकल्पाला प्रतिसाद
देऊळगाव मही : शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी व त्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिनिंग मिल व महाराष्ट्र कॉटन फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने, देऊळगाव राजा तालुक्यात स्मार्ट कॉटन हा प्रकल्प सुरू केला आहे. या अभियानाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.