ही तर मायेच्या माणसांकडून कौतुकाची थाप : श्वेता महाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:25 AM2020-12-27T04:25:26+5:302020-12-27T04:25:26+5:30
चिखली : महिला अत्याचारविरोधी तयार होत असलेल्या शक्ती फौजदारी कायदा समितीवर झालेली नियुक्ती आणि टॉप-५ अभ्यासू आमदार म्हणून आमदार ...
चिखली : महिला अत्याचारविरोधी तयार होत असलेल्या शक्ती फौजदारी कायदा समितीवर झालेली नियुक्ती आणि टॉप-५ अभ्यासू आमदार म्हणून आमदार श्वेता महाले यांचा गौरव झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
चिखली आणि बुलडाणा भारतीय जनता पक्षाच्या वतीने केलेला हा सत्कार घरच्या मायेच्या माणसांनी दिलेली कौतुकाची थाप असून, मला भविष्यात अधिक चांगली कामे करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. मायेच्या माणसांच्या आशीर्वादाने चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यानिमित्ताने आमदार श्वेता महाले यांनी दिली. आ. महाले यांची महिला अत्याचारविरोधी तयार होत असलेल्या शक्ती फौजदारी कायदा समितीवर झालेली नियुक्ती आणि टॉप-५ अभ्यासू आमदार म्हणून झालेली निवड आश्चर्यकारक नक्कीच नाही. कारण आ. महाले हे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू असल्याची चुणूक त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच दाखविलेली आहे. त्यामुळे क्रमाक्रमाने यशाची अनेक शिखरे गाठून चिखली मतदारसंघाचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी यावेळी केले.
यावेळी सतीश गुप्ता अॅड. विजय कोठारी, प्रकाश महाराज जवंजाळ, डॉ. प्रतापसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, अॅड. सुनील देशमुख यांनी केले होते. जिल्हा उपाध्यक्ष देवीदास पाटील जाधव, रामदास देव्हडे, पं. स. सभापती सिंधू तायडे, उपसभापती शमशाद पटेल, न.प. गटनेते प्रा.डॉ. राजू गवई, पं. स. सदस्य सुरेखा गवई, संजय महाले, संजय सदार, संदीप उगले, पंजाबराव धनवे, अॅड. मोहन पवार, योगेश राजपूत, साहेबराव पाटील, शंकर तरमळे, दत्ता शेवाळे, जितेंद्र जैन, प्रा. आनंदराव हिवाळे, शैलेश बाहेती, विजय नकवाल, गोपाल देव्हडे, प्रा. विष्णू जोगदंडे, अनमोल ढोरे, अनुप महाजन, रघुनाथ कुलकर्णी, विजय खरात, रेणुकदास मुळे, ज्ञानेश्वर राजपूत यांची उपस्थिती होती.