‘पाताळगंगे’चे पात्र झाले अरुंद!
By admin | Published: May 30, 2017 12:14 AM2017-05-30T00:14:26+5:302017-05-30T00:14:26+5:30
किनगाव राजा : येथील परिसरातील नदी पात्रांची जागा बेटांनी व गाळाने व्यापली असून, नदीचे पात्र अरुंद होत असल्याने नद्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
किनगाव राजा : येथील परिसरातील नदी पात्रांची जागा बेटांनी व गाळाने व्यापली असून, नदीचे पात्र अरुंद होत असल्याने नद्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
पाताळगंगा नदीचा उगम हा सिंदखेड राजा येथून झाला असून, या नदीला पांगरखेड, हनवतखेड, महारखेड, वाघोरा, खापरखुटी या गावातील छोटे-मोठे नदी-नाल्याचे पाणी येऊन हे संपूर्ण पाणी सावखेड तेजनच्या नदीपात्रात जमा होते व त्या ठिकाणाहून पाताळगंगा नदीचा प्रवास सुरू होऊन पळसखेड चक्का, किनगाव राजा, राहेरी अशा गावातून जाऊन खडकपूर्णा नदीला मिळते. पताळगंगा नदी ही अगदी किनगाव राजा गावाला लागूनच वाहते. येत्या चार ते पाच वर्षापूर्वीपासून नदीपात्राची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. इंग्रज काळापासून नदीपात्र शंभर मीटर असल्यामुळे तेवढा पुल आहे. मात्र आता वाळूउपसा व इतर कारणामुळे नदीचे पात्र फक्त वीस ते ३० फुटापर्यंत राहिले आहे. बाकी नदीपात्राची जागा ही बेटांनी व गाळाने व्यापली आहे. आठ ते दहा वर्षापूर्वी पुराचे पाणी गावात जात असल्यामुळे शासनाने १ कोटी रुपये खर्च करुन संरक्षण भिंत बांधली आहे. पाणी अडविण्यासाठी याच नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधला आहे. शासनामार्फत पाणी अडविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यात जलस्वराज मार्फत सिमेंट बंधारे सुद्धा बांधण्यात येत आहे. आता मात्र गरज आहे ती म्हणजे आमदार निधी व कृषी विभाग यांच्या मार्फत पाताळगंगा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याची. किनगावराजा व परिसरातील गावांना नेहमीच पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. म्हणून पाताळगंगा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण तात्काळ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. जर असे झाले नाही तर पाताळगंगा नदी ही येत्या एक-दोन वर्षात नाहीशी होईल, अशी परिस्थिती निर्माण होत आहे.