रुग्ण दुपटीचा वेग २५ दिवसांवर; चाचण्यांचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 11:30 AM2020-09-09T11:30:24+5:302020-09-09T11:30:34+5:30
कोरोना बाधीतांचा आकडा चार हजाराच्या पुढे गेलेलो असतानाच रुग्ण दुपाटीचा वेग सरासरी २५ दिवसावर येवून ठेपला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा चार हजाराच्या पुढे गेलेलो असतानाच रुग्ण दुपाटीचा वेग सरासरी २५ दिवसावर येवून ठेपला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची व्याप्ती जिल्ह्यात वात असून कोरोना बाधीतांचा मृत्यूदरही १.४० टक्क्यावर आला आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक मलकापूर तालुक्यात असून येथील मृत्यूदर ४.२९ टक्क्यांवर गेला आहे तर बुलडाणा तालुक्यात हा दर २.८८ आहे.
एकूण झालेल्या तपासण्या आणि बाधीत रुग्णांची संख्या यांचा विचार करता जिल्हयात प्रती १०० व्यक्तींमागे १५.३० टक्के व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघत असल्याचे चित्र आहे. यात सर्वाधिक २३.७७ टक्के प्रमाण हे चिखली तालुक्यात असून त्या खालोखाल खामगाव तालुक्यात २१.३० टक्के व्यक्ती बाधीत आढळून येत आहे. जिल्ह्यात आतापयंत २३,९९३ संदिग्ध रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून त्याच्या तुलना करता उपरोक्त प्रमाण आहे. संपलेल्या एका आठवड्यात जिल्ह्यात २,४४३ संदिग्धांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना चाचण्याचाही वेग जिल्ह्यात वाढला आहे.
दुसरीकडे जिल्हयात बाधीत रुग्णांची एकूण संख्या पाहता तपासणी झालेल्यांपैकी १४.०२, चिखलीमध्ये २३.७७, देऊळगावराजात १३.४१, सिंदखेड राजामध्ये ९.४३, मेहकरमध्ये १६.१७, लोणारमध्ये १२.०९, खामगावमध्ये २१.३०, शेगावमध्ये १४.१७, मलकापूरमध्ये १३.०१, मोताळ््यात १९.२६, नांदुºयामध्ये १२.५९, जळगाव जामोदमध्ये ११.३९ आणि संग्रामपूर तालुक्यात ९.१३ टक्के व्यक्ती बाधीत म्हणून आढळून येत असल्याचे चित्र आहे. दरम्यान जिल्हह्यात कोरोनाच्या संक्रमणाची व्याप्ती वाढली आहे. दररोज १०० च्या जवळपास रूग्ण आढळून येत आहेत.
५६६ खाटा उपलब्ध
जिल्ह्यात कोवीड केअर सेंटर, डेडीकेटेड हॉस्पीटलमधील एकूण खाटांचा विचार करता ३४ टक्के खाटांचा उपयोग बाधीत व संदिग्ध रुग्णासाठी वापरण्यात येत आहे. अद्यापही १,५६६ खाटा रिकाम्या आहेत. त्यामुळे आगामी काळात संसर्गाची व्याप्ती वाढण्याची भीती पाहता प्रशासकीय पातळीवर रुग्णांसाठी गरजेनुरूप खाटा उपलब्ध असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
चिखलीत रुग्ण वाढीचा वेग दहा दिवसावर
रुग्ण दुप्पट होण्याचा वेग चिखली तालुक्यात दहा दिवसावर आला असून मोताळा तालुक्यात तो १३ दिवसावर आहे. नांदुरा, जळगाव जामोद तालुक्यात १४, खामगाव, देऊळगाव राजात १५, बुलडाण्यात १७, संग्रामपूरमध्ये १८, सिंदखेड राजा आणि लोणारमध्ये २०, शेगावात २२, मेहकरमध्ये २७ आणि मलकापूरमध्ये तो ३३ दिवसांवर आला आहे. जिल्ह्यात रुग्ण दुप्पट होण्याचा सरासरी वेग हा २५ दिवसावर सध्या आला आहे.