काेविड सेंटरचा रुग्णांना आधार मिळेल : प्रवीण दरेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:26 AM2021-06-02T04:26:16+5:302021-06-02T04:26:16+5:30

चिखली : गेल्या वर्षापासून राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. जनता, सरकारे हैराण आहेत. केलेल्या सर्व उपाययोजना तोकड्या पडत आहेत. ...

Patients will get support from Kavid Center: Praveen Darekar | काेविड सेंटरचा रुग्णांना आधार मिळेल : प्रवीण दरेकर

काेविड सेंटरचा रुग्णांना आधार मिळेल : प्रवीण दरेकर

Next

चिखली : गेल्या वर्षापासून राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. जनता, सरकारे हैराण आहेत. केलेल्या सर्व उपाययोजना तोकड्या पडत आहेत. अशा स्थितीत कोरोना निर्मूलनासाठी केलेला छोटासा प्रयत्नदेखील फार मोठा दिलासा देऊन जातो. त्यामुळेच आमदार श्वेता महाले यांनी कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेले आधार कोविड केअर सेंटर निराधार, गरीब रुग्णांसाठी आधार ठरणारे आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. प्रवीण दरेकर यांनी धाड येथे केले. आ. श्वेता महाले यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्व. दयासागर महाले स्मृती प्रीत्यर्थ धाड येथील सहकार विद्यामंदिराच्या भव्य वास्तूमध्ये ५० खाटांच्या आधार कोविड केअर सेंटरचे उद्‌घाटन ना. दरेकर यांच्या हस्ते २९ मे रोजी पार पडले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्य उपाध्यक्ष चैनसुख संचेती, भाजपा जिल्हाध्यक्ष आ. अ‍ॅड. आकाश फुंडकर, राज्य कार्यकारिणी सदस्य विजयराज शिंदे, बुलडाणा अर्बनचे राधेश्याम चांडक, चिखली अर्बनचे सतीश गुप्त, राज्य कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. विजय कोठारी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, देवीदास जाधव, श्रीरंग एंडोले, पं.स. सभापती सिंधू तायडे, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सुनील देशमुख, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, द्वारका भोसले, संदीप उगले, योगेश राजपूत, किरण सरोदे, विशाल विसपुते, जितू जैन, टीका खान, सोहेल सौदागर यांची उपस्थिती होती. उद्घाटनापूर्वी ना. दरेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

कोरोना महामारीने सारे जग वेठीस धरले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा तातडीने नायनाट व्हावा, असे प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी चिखली येथे ७० खाटांचे कोविड हेल्थ सेंटर सुरू केले आहे. त्यापाठोपाठ आता धाड येथेसुद्धा ५० खाटांचे केअर सेंटर सुरू करण्यात येत आहे, असे आमदार श्वेता महाले यांनी सांगितले. राज्यातील सर्व मान्यताप्राप्त खाजगी कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करून कोरोना व म्युकरमायकोसिसची मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आ. महालेंनी ना. दरेकर यांच्याकडे केली. दरम्यान, संचेती, शिंदे, गुप्ता यांचीदेखील समयोचित भाषणे झाली.

कोविड सेंटरसाठी मदतीचा हात!

आ. महाले यांनी लोकसहभागातून कोरोना रुग्णांचा मोफत उपचार करण्यासाठी धाड येथे सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरसाठी अनेक दात्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यावेळी मान्यवरांनी काेविड सेंटरसाठी ५७ हजार रुपयांची मदत दिली. या मदतीचा धनादेश ना. दरेकर यांच्या हस्ते आ. महाले यांच्याकडे सुपुर्द केला.

Web Title: Patients will get support from Kavid Center: Praveen Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.