बुलडाणा शहरात दाेन वाहनांनी घातली जातेय गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:31 AM2021-01-21T04:31:06+5:302021-01-21T04:31:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : शहर पाेलिसांच्या वतीने दाेन जीपच्या माध्यमातून रात्रभर गस्त घालण्यात येते. १० ते १२ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शहर पाेलिसांच्या वतीने दाेन जीपच्या माध्यमातून रात्रभर गस्त घालण्यात येते. १० ते १२ कर्मचारी रात्री गस्त घालतात. मात्र, तरीही चाेरट्यांचा हैदाेस सुरूच असल्याचे चित्र आहे.
बुलडाणा शहरात गत काही दिवसांपासून चाेरट्यांचा हैदाेस सुरू आहे. बंद घरे फाेडण्याचा सपाटाच चाेरट्यांनी लावला आहे. शहरातील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागातही ऐवज लंपास करण्यात येत आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुताेंडेे यांच्या सरस्वतीनगरातील घरातून चाेरट्यांनी २५ हजारांचा एवज लंपास केला हाेता. त्यांच्या शेजारील घरातील ऐवजही चाेरट्यांनी लंपास केला हाेता.
गत काही दिवसांपासून घरफाेडीच्या घटना वाढल्या आहेत. पाेलिसांचा वचक राहिला नसल्याने चाेरीच्या घटनांत माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाेलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चाेरट्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावरच हाेते गस्त
शहर पाेलीस ठाण्यात उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे गस्त घाली घातली जाते. दाेन जीपमध्ये सहा, सहा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गस्त घातल्या जाते. शहरातील मुख्य रस्त्यावरच गस्त घातल्या जाते. दुचाकी वाहने नसल्याने केवळ मुख्य रस्त्यावरच पाेलीस दिसतात.
नागरिकही बेसावध
चाेरीच्या घटना वाढल्या असल्या तरी नागरिकही बेसावध असल्याचे चित्र आहे. पाेलिसांनी आवाहन केल्यानंतरही आवश्यक त्या उपाययाेजना करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. लाखाे रुपयांच्या मालमत्तेचे रक्षण स्वस्त कुलूपावर साेडून नागरिक बाहेरगावी जातात. त्यामुळे, चाेरट्याचे फावत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनीही सावधगिरी बाळण्याची गरज आहे.
खबरदारी घ्यावी
बुलडाणा शहरात १० ते १२ पाेलीस दरराेज रात्री गस्त घालतात. नागरिकांनीही बाहेरगावी जाताना पाेलिसांना कळवावे. तसेच इतर उपाययाेजना कराव्यात. घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. बाहेरगावी जाताना महागड्या वस्तू घरात ठेवू नये.
सुनील साेळंके, ठाणेदार, बुलडाणा
गस्त वाढविण्याची गरज
शहरात गस्त वाढविण्याची गरज आहे. तसेच प्रत्येक भागात दुचाकीने गस्त घालण्याची गरज आहे. चाेरीच्या घटनांमध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.