राहेरी पूल पुनर्निर्माणाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:35 AM2021-02-16T04:35:31+5:302021-02-16T04:35:31+5:30
त्यातच नागपूर-मुंबई हा मार्ग दर्जोन्नत होवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७३५ सी झाला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अैारंगाबाद विभागातंर्गत हा ...
त्यातच नागपूर-मुंबई हा मार्ग दर्जोन्नत होवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७३५ सी झाला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अैारंगाबाद विभागातंर्गत हा रस्ता आला आहे. या रस्त्यावरच खडकपूर्णा नदीवर राहेरी गावानजीक हा पूल आहे. त्याची झालेली दुरवस्था व धोकादायक स्थिती पाहता त्याचे तातडीने पुनर्निर्माण करणे काळाची गरज बनली होती. त्यानुषंगाने दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीस पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर या पुलाच्या पुनर्निर्माणास मान्यता देण्यात आली आहे. जुना पूल हा १९७१-७२ मध्ये उभारण्यात आला होता. तो सध्या धोकादायक बनला आहे.
सहा कोटींचा खर्च अपेक्षित
विशेष दुरुस्ती कार्यक्रमातंर्गत या पुलासाठी ६ मार्च २०१९ रोजी या पुलासाठी ९ कोटी ८५ लाख रुपयांच्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली होती. दरम्यान, या पुलाच्या कामासोबतच राहेरी येथे वळणमार्गही प्रस्तावित असल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने वळणमार्गासाठी ६ कोटी २१ लाख रुपये तर पुलाच्या सुपल स्ट्रक्चरसाठी पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
--४१ किमीचा फेरा वाचेल--
हा पूल पूर्णत्वास गेल्यानंतर अैारंगाबाद तथा मेहकरकडून येणाऱ्या वाहनांचा तब्बल ४१ किमींचा फेरा वाचणार आहे. सोबतच सिंदखेडराजा व लोणार तालुक्यातील व्यावसायिक व सामान्य नागरिक यांचे आर्थिक नुकसान टळून या मार्गावर रोजागारनिर्मितीस अधिक चालना मिळणार आहे. त्यानुषंगाने पाठपुरावा करून पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दोन वर्षांपासून रखडलेले हे काम मार्गी लावले आहे.