फुटपाथ हरविले

By admin | Published: December 28, 2014 12:29 AM2014-12-28T00:29:01+5:302014-12-28T00:29:01+5:30

बुलडाणा, खामगाव शहरातील वाहतुकीची कोंडी वाढली.

Pavement lost | फुटपाथ हरविले

फुटपाथ हरविले

Next

बुलडाणा : जिल्ह्याचे मुख्यालय आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या बुलडाणा शहराला ऐतिहासिक व पौराणीक वारसा लाभलेला आहे. इंग्रजकालीन राजवटीतील अनेक पाऊलखुणा आजही येथे अस्तीत्वात आहेत. शहराची वाढती लोकसंख्या, दिवसागनीक वाढत असलेली वाहनाची संख्या, याचे नियोजन करण्यास मात्र नगर पालिका अपयशी ठरत आहे. शहरातील अरुंद रस्ते, रस्त्यावर पदोपदी असलेले खड्डे यामुळे वाहनधारक आणि पादचार्‍यास रस्त्यावर चालताना कसरत करावी लागते. शहरात वाहनाची वाढती गर्दी लक्षात घेता रस्त्याच्या कडेला पादचार्‍यासाठी फुटपाथ असणे आवश्यक आहे. तथापि बुलडाणा शहरातील एकाही रस्त्याला फुटपाथ नाहीत. जयस्तंभ चौकातून शहराच्या चारही भागात मुख्य रस्ते जातात.या एकाही रस्त्यावर फुटपाथ नसल्यामुळे पादचार्‍यास त्रास सहन करावा लागतो.

* फुटपाथवर अतिक्रमिकांचे वर्चस्व !
खामगाव शहरात पादचार्‍यांना रस्त्यावरुन ये-जा करण्यासाठी सोडलेल्या फुटपाथला रस्त्याच्या दोन्ही बाजुंना अतिक्रमणाचा वेढा आहे. परिणामी वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना रस्त्यावरुन फिरणे अवघड झाले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर कुठेही जा दोन्ही बाजुंनी लघु व्यवसायीक वाहनधारकांनी फुटपाथच्या जागेवर ताबा घेतला आहे. रस्त्यालगतचा परिसर चालण्यासाठी मोकळा नसल्याने वाढत्या वाहतुकीने नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत घेवून चालावे लागते. खामगाव-नांदुरा रस्ता हा वाहतुकीसाठी नेहमीसाठी गर्दीचा झाला आहे. या रस्त्यावर वाहनांची वाढती वर्दळ पाहता रस्ता ओलांडण्यासाठी पादचार्‍यांना सहज १0 ते १५ मिनीट वाट पाहावे लागते.

Web Title: Pavement lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.