एक रुपयात पीक विमा भरा, जास्त पैसे देऊ नका; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2023 11:29 AM2023-07-27T11:29:54+5:302023-07-27T11:30:13+5:30

शासनाने सन २०२३-२४ पासून सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Pay crop insurance for one rupee, don't overpay; Appeal of Sub-Divisional Officers | एक रुपयात पीक विमा भरा, जास्त पैसे देऊ नका; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन

एक रुपयात पीक विमा भरा, जास्त पैसे देऊ नका; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन

googlenewsNext

शासनाने सन २०२३-२४ पासून सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकरी विमा हप्त्याची रकम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पोर्टलवर शेतकऱ्यांना तसेच विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्रा मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल.

पीक विमा योजनेतील सहभागाची नोंदणी करण्याकरीता सामुहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनी मार्फत प्रति अर्ज रकम ४० रुपये देण्यात येत आहे. तरी सुध्दा उपविभागातील खामगाव व शेगाव येथील सामुहिक सेवा केंद्रामध्ये केंद्र धारक शेतकऱ्यांकडून अतिरीक्त पैसे घेत असल्याबाबतच्या तोंडी तक्रारी प्राप्त होत आहेत.

शेतकरी बांधवांनी सामुहिक सेवा केंद्र येथे सदर योजनेची नोंदणी करताना आवश्यक ते कागदपत्रे घेवून नोंदणी करावी, नियमानुसार निर्धारीत करण्यात आलेल्या रकमेचाच भरणा करावा, अतिरिक्त पैसे देण्यात येवू नये, सामूहिक सेवा केंद्र धारक शेतकऱ्यांकडून अतिरीक्त पैश्याची मागणी केल्यास त्याबाबत संबंधीत तालुक्याचे तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या कडे तक्रार दाखल करावी असे आवाहन केले आहे.

Web Title: Pay crop insurance for one rupee, don't overpay; Appeal of Sub-Divisional Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.