मृताच्या पत्नीला तात्काळ थकीत वेतन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:37 AM2021-08-27T04:37:35+5:302021-08-27T04:37:35+5:30
कंडारी येथील ग्रामपंचायत कर्मचारी उद्धव कायदे यांचे २३ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांचा रक्षा विसर्जनाचा ...
कंडारी येथील ग्रामपंचायत कर्मचारी उद्धव कायदे यांचे २३ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम कंडारी येथे पार पडला. जिल्हा परिषदेचे सभापती दिनकर देशमुख, पंचायत समिती उपसभापती बद्री बोडके, शंकर उगलमुगले, ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हा संघटक कुमारी सोनाली जगताप, सिंदखेड राजा ग्रामपंचायत कर्मचारी युनियन मार्फत सरपंच सचिव यांना निवेदन देण्यात आले असून, कै. उद्धव कायंदे यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे सदर कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे ग्रामपंचायतकडील थकीत वेतन, थकीत राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधी रक्कम त्यांच्या पत्नी सिंधूबाई उद्धव कायंदे यांना देण्यात यावे. या गोष्टीचा विचार करून तालुका कार्यकारिणीच्यावतीने सरपंच संपत पवार व ग्रामसेवक सुनील सानप यांना करण्यात आली. त्यांनी स्व. उद्धव कायंदे यांच्या जागेवर ग्रामपंचायतीच्या कामावर त्यांच्या पत्नी सिंधुबाई उध्दव कायंदे यांना कामावर रुजू करून घ्यावे अशी मागणी करण्यात आली.