पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके तत्काळ अदा करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:33 AM2021-07-29T04:33:50+5:302021-07-29T04:33:50+5:30

सिंदखेड राजा: बुलडाणा जिल्ह्यातील १६७ पोलीस कर्मचाऱ्यांची जवळपास तीन ते चार वर्षांपासून वैद्यकीय देयके प्रलंबित आहेत़ वैद्यकीय देयके तत्काळ ...

Pay medical personnel medical bills immediately! | पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके तत्काळ अदा करा !

पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके तत्काळ अदा करा !

Next

सिंदखेड राजा: बुलडाणा जिल्ह्यातील १६७ पोलीस कर्मचाऱ्यांची जवळपास तीन ते चार वर्षांपासून वैद्यकीय देयके प्रलंबित आहेत़ वैद्यकीय देयके तत्काळ देण्यात यावीत, अशी मागणी अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या वतीने पालकमंत्री डॉ़ राजेंद्र शिंगणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. वैद्यकीय देयके सादर केल्यानंतर त्यात वेळोवेळी त्रुटी काढण्यात येतात़ त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी कर्ज काढून वैद्यकीय खर्च केलेला आहे़ त्या कर्मचाऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पोलीस महानिरीक्षक अमरावती यांच्याकडून तत्काळ वैद्यकीय देयके देण्यात यावीत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़ निवेदन देताना अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगन झोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे, समता परिषद तालुका अध्यक्ष संदीप मेहेत्रे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश खुरपे, सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार, संजय मेहेत्रे, गजानन मेहेत्रे, वाजेद पठाण आदी उपस्थित होते.

Web Title: Pay medical personnel medical bills immediately!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.