नियमीत कर भरा, माेफत डाळ मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:47 AM2021-02-27T04:47:05+5:302021-02-27T04:47:05+5:30
माेताळा : थकीत कर वसुलीसाठी ग्रामपंचायतींच्या वतीने विविध उपाय याेजना राबवण्यात येतात. माेताळा तालुक्यातील स्मार्ट ग्राम शेलगाव बाजारच्या लाेकनियुक्त ...
माेताळा : थकीत कर वसुलीसाठी ग्रामपंचायतींच्या वतीने विविध उपाय याेजना राबवण्यात येतात. माेताळा तालुक्यातील स्मार्ट ग्राम शेलगाव बाजारच्या लाेकनियुक्त सरपंच सरपंच सरलाताई अमित खर्चे यांनी नियमीत कर भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी आगळीवेगळी याेजना सुरू केली आहे. मुदतीत कर भरणाऱ्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतींच्या वतीने माेफत १०० किलाे डाळ तयार करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
ग्रामपंचायतीच्या वतिने ज्या मालमत्ताधारकाने चालु सन २०/२१ या आर्थिक वर्षाचा ग्रामपंचायतीच्या सर्व कराचा भरणा केलेला असेल किंवा ज्यांचा कर भरणा राहिलेला असेल त्यांनी १५ मार्च पर्यंत आपला कर भरणा करावा व या कर भरणा केलेल्या सर्वांना ३१ मार्च २०२१ पर्यंत आता येणाऱ्या २७ फेब्रु शनिवार पासुन प्रति कुटुंब १०० किलो( एक क्विंटल)डाळ मोफत तयार करुन मिळेल. डाळी ह्या तुर,हरभरा,मुंग,ऊळीद यापैकी (एकत्रित १०० किलो मिळुन) ज्या पाहिजे त्या करुन मिळतील. या डाळी करुन देण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वनिधीतुन स्वत:ची गिरणी सुरु केली आहे.गिरणी चालु करतांना सद्यःस्थितीत प्रत्येक आठवड्यातिल दोन दिवस ( शनिवार व रविवार)चालु राहिल.तरी ग्रामस्थांनी डाळ तयार करण्यासाठी प्रत्येक आठवड्यातिल शनिवार व रविवार या दोन दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत यावे.येतांना चालु वर्षाचा कर भरणा केल्याचे ग्रामपंचायतिची पावती सोबत आणावी.ज्यांना काही शंका वा संबंधित योजनेबद्दल काही विचारायचे असेल त्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन उद्घाटन प्रसंगी लोकनियुक्त सरपंचा सरलाताई खर्चे यांनी केले आहे. या गिरणीच्या उद्घाटन प्रसंगी सर्व ग्रामंचायत सदस्य उपस्थित हाेते.