खामगाव बसस्थानकात अनागोंदी कारभाराचा कळस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 02:07 PM2019-08-24T14:07:04+5:302019-08-24T14:07:20+5:30

पासेस विभागातील कर्मचाºयांच्या मनमानीमुळे विद्यार्थी, वृध्दांना त्रास सहन करावा लागत आहे.

The peak of chaos in the Khamgaon bus station! | खामगाव बसस्थानकात अनागोंदी कारभाराचा कळस!

खामगाव बसस्थानकात अनागोंदी कारभाराचा कळस!

googlenewsNext

- देवेंद्र ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील बसस्थानकात अनागोंदी कारभाराचा कळस झाला आहे. पासेस विभागातील कर्मचाºयांच्या मनमानीमुळे विद्यार्थी, वृध्दांना त्रास सहन करावा लागत आहे. शनिवारी दुपारी विद्यार्थिनींना पासेस देण्यास कर्मचाºयांनी नकार दिला. शेवटी विद्यार्थिनी सहाय्यक वाहतूक अधिक्षकांच्या कक्षात पोहचल्यानंतर त्यांना पासेस देण्यात आल्या.
खामगाव आगार गत अनेक दिवसांपासून या-ना त्या कारणामुळे चर्चेत आहे. याआधी फुलपगारे यांच्या मनमानीला सर्वच कंटाळले होते. तो घोळ निस्तरत नाही, तोच आता आणखी नवनवीन प्रकार समोर येत आहेत. शुक्रवारी एकाला मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दरम्यान शनिवारी खामगाव बसस्थानकात पासेस विभागात फेरफटका मारला असता, आणखी नवीन प्रकार निदर्शनास आला. पासेस विभागासमोर काही विद्यार्थिनी उभ्या होत्या. त्यांना पासेस देण्यास कर्मचारी नकार देत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थीनी थेट सहाय्यक वाहतूक अधिक्षक रामकृष्ण पवार यांच्या कक्षात पोहचल्या. पवार यांनी संबंधित कर्मचाºयांना निर्देश दिल्यानंतर विद्यार्थिनींना पासेस देण्यात आल्या. पासेस विभागाचे दार वारंवार लावून घेवून ‘आता सोमवारी या’ असे कर्मचारी सांगत असल्याचे प्रत्यक्ष निदर्शनास आले. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पासेसबाबत निर्माण होणाºया समस्या सोडवाव्या, अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या पासेस विभागात दोन काऊंटर सुरू आहेत. विद्यार्थ्यांसाठी पासेसची वेळ सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. असे असताना, शनिवारी मात्र सकाळी ८ ते सायंकाळी ५ अशी वेळ ठेवण्यात आली होती; हे विद्यार्थ्यांच्या आकलना पलीकडचे असल्याचे दिसून आले. जेष्ठ नागरिकांसाठी दुपारी २ ते रात्री १० अशी वेळ आहे. या व्यतिरिक्त शहरात जेष्ठ नागरिकांसाठी ४ नोंदणी केंद्र सुरू असल्याचेही सांगण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात आल्यानंतरही खामगाव बसस्थानक परिसरात धांदल का उडते? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 
सुरक्षा रक्षकाला धमक्या!
खामगाव बसस्थानक परिसरात अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. शेख आमिर असे सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. शेख आमिर हे बेशिस्तपणे वागणाºया टवाळखोरांना वठणीवर आणण्याचे काम करीत असताना, त्यांना मारहाण करण्याच्या धमक्या येत आहेत, असे शेख आमिर यांनी सांगितले. याबाबत त्यांनी  आगार व्यवस्थापनाकडे तक्रारही दिली आहे. 

 
१ लाख १८ हजार स्मार्ट कार्डचे लक्ष्य!
खामगाव तालुक्यात १ लाखापेक्षा जास्त जेष्ठ नागरिक व १८ हजार विद्यार्थी आहेत. त्यामुळे पासेस विभागात मोठी गर्दी होत आहे. पासेससाठी येणाºया विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता महिन्याच्या शेवटी २८ तारखेपासून ते पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत काऊंटर वाढविण्यात येतात. परंतु आॅनलाईन काम करताना सर्व्हर संथ गतीने काम करीत असल्याने पासेस वितरणाचे प्रमाण कमी होते, असे सहाय्यक वाहतूक अधिक्षक पवार यांनी सांगितले. विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांना वेठीस धरणाºया कर्मचाºयांची गय करणार नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: The peak of chaos in the Khamgaon bus station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.