नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:35 AM2021-03-27T04:35:58+5:302021-03-27T04:35:58+5:30

जानेफळ : कोरोना नियमाची पायमल्ली करणाऱ्या तसेच विना मास्क फिरणाऱ्यांवर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत ...

Penalties for violating the rules | नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड

Next

जानेफळ : कोरोना नियमाची पायमल्ली करणाऱ्या तसेच विना मास्क फिरणाऱ्यांवर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत विना मास्क फिरणाऱ्यांकडून ४ हजार २०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे या कारवाईचा अनेकांनी धसका घेतला आहे.

लाेककलावंतावर उपासमारीची पाळी

बुलडाणा : गत वर्षीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना महामारीचे संकट आले होते. या आजाराला आळा घालण्यासाठी शासन निर्देशाप्रमाणे एक वर्षापासून नाकाबंदी सुरु झाली. त्यामुळे कलावंतांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाकडून लोककलावंतांना मदत करावी अशी मागणी होत आहे.

जलजागृती सप्ताहाचा समाराेप

बुलडाणा : शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्ताने २२ मार्च रोजी जिल्ह्यात १६ मार्चपासून सुरू असलेल्या जल जागृती सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सप्ताहाचा समारोप बुलडाणा पाटबंधारे विभागाचे सहा. अभियंता तुषार मेतकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बुलडाणा पाटबंधारे मंडळ कार्यालयात पार पडला.

मृतांच्या वारसांना मदतीचे वाटप

माेताळा : तालुक्यातील बोराखेडी येथील एका महिलेचे जवळपास एक महिन्याआधी आकस्मिक निधन झाले होते. त्या महिलेच्या वारसांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा अंतर्गत दोन लाख रुपये विम्याचे पैसे त्यांच्या येथील स्टेट बँक खात्यात जमा करून देण्यात आले आहे.

वसीम रिजवी विरुद्ध गुन्हा दाखल करा

सिंदखेडराजा : कुरान शरीफ बद्दल अशोभनीय टिप्पणी केल्या संदर्भात साखरखेर्डा येथील युवकांनी ठाणेदार जितेंद्र आडोळे यांना वसीम रिजवी विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन दिले आहे. या प्रकरणाचा निवेदनातून निषेध करण्यात आला.

माेताळ्यात चाेरट्यांचा हैदाेस सुरूच

माेताळा : शहरातील बसस्थानक परिसरातील लोखंडे कॉम्प्लेक्समधील एका किराणा दुकानदाराची रोख १८ हजार रुपये तसेच व्यवहाराच्या हिशाेबाच्या डायऱ्यासह दोन हजार रुपये किमतीची स्वॅब मशीन असा एकूण वीस हजाराचा माल चोरट्याने लंपास केला आहे.

शहिदांना पालकमंत्र्यांनी केले अभिवादन

बुलडाणा : शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला मुंबई येथील मंत्रालयात व जे. जे रुग्णालयात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दिव्यांगांना घरपाेच लस देण्याची मागणी

चिखली : वयाच्या ६० वर्षांनंतर अपंग व्यक्तीला बेडवरून उठणे अवघड असते. ते कोविडची लस घेण्यासाठी रुग्णालयापर्यंत जाण्यास असमर्थ असल्यामुळे जिल्ह्यातील अपंग व्यक्तींना घरपोच जाऊन कोविड-१९ चे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक नामू गुरुदासानी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे २२ मार्च रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी

बुलडाणा : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. साेंगणीला आलेल्या गहू , हरभरा व इतर पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे, नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पक्ष्यांसाठी युवकांनी लावले पाणीपात्र

धाड : येथील भीमनगरातील चार युवकांनी पक्ष्यांसाठी पाणीपात्र लावले आहे. कडाक्याच्या उन्हामुळे पशु, पक्षांना पाण्याची टंचाई जाणवत आहे. धाड येथील युवकांनी पक्ष्यांसाठी पाणीपात्र लावले आहे.

Web Title: Penalties for violating the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.