पैनगंगेवर बंधारे उभारणार; तांत्रिक बाबी तपासण्याचे जलसंपदा विभागाला निर्देश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:14 AM2017-12-23T00:14:37+5:302017-12-23T00:16:54+5:30
बुलडाणा : अजिंठा पर्वतराजीत उगम पावणार्या पैनगंगा नदीवर बुलडाणा जिल्ह्यातील ९0 किलोमीटर लांबीपेक्षा अधिक भागात ठिकठिकाणी गेटचे बंधारे उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यानुषंगाने जलसंपदा आणि जलसंधारण विभागाने तांत्रिक बाबी तपासण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : अजिंठा पर्वतराजीत उगम पावणार्या पैनगंगा नदीवर बुलडाणा जिल्ह्यातील ९0 किलोमीटर लांबीपेक्षा अधिक भागात ठिकठिकाणी गेटचे बंधारे उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यानुषंगाने जलसंपदा आणि जलसंधारण विभागाने तांत्रिक बाबी तपासण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.
दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे बुलडाणा जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी यासंदर्भातील सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. येत्या २३ डिसेंबरला किसान दिन देशात साजरा केला जातो. त्यानुषंगाने शेतकर्यांना सिंचन सुविधांसह पीक पाण्यात काय बदल झाला, यासंदर्भाने आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता, ही माहिती समोर आली नाही.
पैनगंगा नदीवर बुलडाणा जिल्ह्यात विशेषत: बुलडाणा विधानसभा मतदार संघात २0 बंधारे उभारण्याबाबतचा प्रस्ताव होता. त्यानुषंगाने मध्यंतरी चाचपणीही झाली होती. हा मुद्दा आता आणखी पुढे सरकला असून, त्यासंदर्भात तांत्रिक बाबी तपासण्याच्या या सूचना दिल्या गेल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. अवर्षण प्रवण भागात यातील काही भाग येत असल्याने हे बंधारे प्रत्यक्षात अस्तित्वात आल्यास या भागातील शेतकर्यांना शेती सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न फारसा उद्भवणार नाही. आता जलसंपदा विभागाच्या अहवालाकडे लक्ष लागून आहे.
नदीवर आठ ‘मायनर टँक’
साधारणत: ३५0 ते ४५0 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकले असते. जवळपास आठ मायनर टँक (छोटे तलाव) पैनगंगा नदीवर यापूर्वी उभारण्यात आलेले आहेत. त्यातून लगतच्या शेतीला वर्षभर नाही तरी किमान आठ महिने सिंचनाचा लाभ होतो. त्याची व्याप्ती वाढवून मोठय़ा स्तरावर हे बंधारे उभारल्या गेल्यास परिसरातील शेतीला सिंचनाच्या पाण्याचा लाभ होऊ शकतो. त्याबाबतची ही शक्यता तपासण्यात येणार आहे.
भूसंपादनाची गरज नाही
४हे बंधारे उभारताना त्यासाठी शेतकर्याची जमीन संपादित करण्याचा मुद्दा उपस्थित होत नाही. नदीपात्रातच हे पाणी बंधार्याद्वारे साठवता येणे शक्य आहे. नदी पात्रालगतची एखाद दोन फूट जमीन एखाद वेळेस यामुळे प्रभावित होईल; मात्र मोठय़ा प्रमाणावर भूसंपादन करण्याची यात गरज नसल्याचेही संकेत मिळाले आहेत.