जऊळका येथे साथीचे आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 12:43 AM2017-09-06T00:43:18+5:302017-09-06T00:44:50+5:30
वातावरणाच्या बदलामुळे जऊळका परिसरात साथीच्या आजाराने डोके वर काढले असून, लहान बाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच साथीच्या आजाराने ग्रासले आहे. परिसरात रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जऊळका: वातावरणाच्या बदलामुळे जऊळका परिसरात साथीच्या आजाराने डोके वर काढले असून, लहान बाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच साथीच्या आजाराने ग्रासले आहे. परिसरात रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे.
गावात प्रामुख्याने सर्दी, खोकला व ताप या आजाराचे रुग्ण गावाच्या घराघरात दिसून येतात. मलकापूर पांग्रा प्राथमिक आरोग्य केंद्र या रुग्णांना दूर पडत असल्याने, जऊळका येथील रुग्ण बिबी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी जातात; परंतु तेथेही तालुका बदल असल्याचे निमित्त पुढे करून रुग्णांची हेळसांड होत असल्याने रुग्णांना नाइलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंंड सोसावा लागत आहे. या गावाकडे शासनाचा कोणताही आरोग्य सेवक फिरकत नाही. तरी वरिष्ठ पातळीवरून लक्ष देण्याची मागणी होत आहे.