लोकवस्तींना धोका!

By admin | Published: October 24, 2016 02:50 AM2016-10-24T02:50:26+5:302016-10-24T02:50:26+5:30

वर्षभरात १0७ शेतक-यांवर पशू हल्ले

People are at risk! | लोकवस्तींना धोका!

लोकवस्तींना धोका!

Next

बुलडाणा, दि. २३- गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील वनक्षेत्राला लागून असलेल्या लोकवस्तीतील मनुष्यांवर वन्य प्राण्यांकडून हल्ले झाल्याच्या घटना पुढे येत आहेत. मागील वर्षभराचा आढावा घेतला असता, तब्बल १0७ वेळा हिंस्र पशूंकडून मनुष्यांवर हल्ला करण्यात आला आहे. पशू हानी, पीक हानी व मनुष्य हानी मोठय़ा प्रमाणात झाली.
बुलडाणा, खामगाव, मोताळा, मेहकर, लोणार या तालुक्याला लागून मोठी वनसंपदा आहे. या जंगलामध्ये विविध वन्य प्राणी व हिंस्र श्‍वापदे आढळतात. बर्‍याच वेळा वन्य प्राणी अन्न व पाण्याच्या शोधात वस्त्याकडे येत आहेत. शिवाय सध्या कोणतेही जंगल वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित राहिले नाही. वन्य प्राण्यांच्या हक्काच्या व सुरक्षित असलेल्या जंगलात मानवी हस्तक्षेप मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे.
परिणामी वनक्षेत्रानजिकच्या मानवी वस्तीमध्ये शेतकरी, पाळीव प्राण्यांवर वन्य प्राण्यांकडून प्राणघातक हल्ला होत आहे. बिबट, रानडुक्कर, अस्वल, कोल्हा, लांडगा, तडस या हिंस्र प्राण्यांकडून गिरडा, मोताळा, रोहिणखेड, नळकुंड, खडकी, धामणगाव बढे, खांडवा, कुर्‍हा, कोर्‍हाळा, डोंगरखंडळा, वरवंड पळसखेड भट, दहीद बु., गोंधनखेड, बिरसिंगपूर, हतेडी, पळसखेड, केळवद, नाईक उंद्री गावातील शेतकरी व त्यांच्या जनावरांवर हल्ले झाले आहेत.

अस्वलाचा दहशत कायम
गेल्या अनेक दिवसांपासून डोंगरखंडाळा, वरवंड या भागामध्ये अस्वलाने हैदोस घातला आहे. यात दोन महिन्यात पाच शेतकर्‍यांना जीव गमवावा लागला. यामुळे येथील भागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी अस्वलाचा शोध घेत आहेत, तरी सुद्धा वन विभागाला अस्वलाचा शोध लागत नाही. यासाठी शासनाने या अस्वलाचा शोध घेऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

विजेची कुंपणे जनावरांच्या जीवावर
शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे हे वन्य प्राणी प्रचंड नुकसान करीत आहेत. शेतीतील पीक वाचविण्यासाठी मग शेतकरी विविध तंत्राचा वापर करतात. यातून प्राण्यांच्या जीवित्वाला धोका होतो. पिंप्री गवळी, धाड, पिंपळगाव सैलानी, चांडोळ, डोंगरखंडाळा, वरवंड, मोताळा आदी भागात वर्षभरात २५ वन्य प्राण्यांचा विजेच्या ध क्क्याने मृत्यू झाला.

बोरखेड परिसरात शिकारी टोळी सक्रिय
रानडुकरांची हत्या करणारी शिकारी टोळी सक्रिय झाली असून, वन्य जीव विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
बोरखेड, दि. २३- बोरखेड, दानापूर, बल्हाडी, वानखेड परिसरात गेल्या काही दिवसां पासून रानडुकरांची हत्या करणारी शिकारी टोळी सक्रिय झाली आहे. मात्र, याकडे वन्य जीव विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
परिसरातील वसाळी, आलेवाडी या भागातील पाच ते सहा इसम सायंकाळीच्या सुमारास दाखल होतात. ज्या भागात रानडुकरांचा वावर आहे. तेथे बारुदचा फटाका लावून ठेव तात. या बारुदी फटाक्यांना खाद्य पदार्थाचे वेस्टन लावल्या जाते. त्या वासाने ते उकरून खाण्याच्या प्रयत्नात स्पंज बारुदच्या फटाक्याचा स्फोट होऊन रानडुक्कर जायबंदी होते. वेळप्रसंगी रानडुकराचा जबडा फाटून ते मृत्युमुखीदेखील पडते. जायबंदी झालेल्या रानडुकराला ही शिकारी टोळी पोत्यात टाकून घेऊन जाते.

परिसरात शिकारी टोळी सक्रिय झाली असेल, तर त्या दिशेने गुप्त माहितीच्या आधारे त्वरित तपास केला जाईल.
- एस.झेड. काझी
वनपरीक्षेत्र अधिकारी, सोनाळा विभाग

Web Title: People are at risk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.