शिक्षक कुटुंबासाठी सरसावले मदतीचे हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 05:38 PM2018-09-18T17:38:51+5:302018-09-18T17:39:37+5:30
मेहकर : कर्करोगाशी झुंज देत नऊ सप्टेंबरला निधन झालेले शिक्षक तथा उत्कृष्ट व्हॉलीबॉल पटू रमेश गवई यांच्या परिवारास शिक्षकांकडून ७१ हजार रूपयांची मदत आमदार संजय रायमुलकर यांच्याहस्ते १५ सप्टेंबर रोजी देण्यात आली.
मेहकर : कर्करोगाशी झुंज देत नऊ सप्टेंबरला निधन झालेले शिक्षक तथा उत्कृष्ट व्हॉलीबॉल पटू रमेश गवई यांच्या परिवारास शिक्षकांकडून ७१ हजार रूपयांची मदत आमदार संजय रायमुलकर यांच्याहस्ते १५ सप्टेंबर रोजी देण्यात आली.
तालुक्यातील बाभूळखेड शाळेवर पदवीधर शिक्षक रमेश भिकाजी गवई यांना कर्करोग झाला होता. दरम्यान, ९ सप्टेंबरला त्यांचे मेहकर शहरातील रामनगर मध्ये निधन झाले. गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांचे मार्गदर्शनाखाली मेहकर पंचायत समिती अंतर्गत एखाद्या शिक्षकाचा मृत्यु झाल्यास त्या परिवारास आर्थिक मदत देण्याचा उपक्रम सुरु आहे, त्यानुसार १५ सप्टेंबर रोजी जमा झालेले ६६ हजार रूपये व आ. रायमुलकर यांनी स्वत: पाच हजार रूपये या जमा रकमेत टाकले व एकूण ७१ हजार रूपये रमेश गवई यांच्या पत्नीस देण्यात आले.@यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश पवार प्राथमिक शिक्षक समीतीचे अध्यक्ष प्रकाश सास्ते, कास्ट्राईब शिक्षक संघटना अध्यक्ष पी. ए. मोरे, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजू शिंदे, संजय काळे, सुनील मगर, माधव पवार, केशव निकम, प्रदीप जोशी, संजय जुमडे, सुधीर मैंदकर, हिरालाल डोंगरे, बाभूळखेडचे मुख्याध्यापक भगवान तांगडे, अर्जुन गवई, समाधान गवई, बबन रत्नपारखी, गजानन राजकर, रमेश बोरकर सह शिक्षक हजर होते. प्रास्ताविक किरण डोंगरदिवे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)