वनराई निर्माण करण्यासाठी जनचळवळ आवश्यक - संजय कुटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 02:34 PM2019-07-15T14:34:45+5:302019-07-15T14:34:55+5:30

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या उपक्रमाला जनचळवळीचे रूप प्राप्त झाले आहे, असे मत कामगार मंत्री तथा पालकमंत्री ना.डॉ.संजय कुटे यांनी व्यक्त केले.

Peoples Movement requires creation of forests - Sanjay Kute | वनराई निर्माण करण्यासाठी जनचळवळ आवश्यक - संजय कुटे

वनराई निर्माण करण्यासाठी जनचळवळ आवश्यक - संजय कुटे

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड या महत्वाकांक्षी योजनेला यश मिळण्यासाठी जनचळवळ आवश्यक आहे. तशी मानसिकता सर्वांची तयार झाल्याने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या उपक्रमाला जनचळवळीचे रूप प्राप्त झाले आहे, असे मत कामगार मंत्री तथा पालकमंत्री ना.डॉ.संजय कुटे यांनी व्यक्त केले. ते सामाजिक वनीकरण व वनविभाग यांच्यावतीने आयोजित सातपुड्याचे निसर्ग स्वप्न महावृक्षारोपण या कार्यक्रमात उद्घाटक पदावरून बोलत होते.
रसुलपूर ग्रामपंचायतीमधील निमखेडी शिवारात एकुण २५ हजार झाडांच्या गट वृक्षलागवडीसाठी महावृक्षारोपणाचे आयोजन करीत परिसरात श्रमदानाचे तसेच ‘एक व्यक्ती एक झाड’ संगोपनाचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी ना.डॉ.संजय कुटे यांच्यासह सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी संजय पार्डीकर, उपवनसंरक्षक संजय माळी, जि.प. सदस्य रूपाली काळपांडे व मंजुषा तिवारी, सरपंच शमुन्नीसा महमद, उपविभागीय महसुल अधिकारी वैशाली देवकर, श्री कोटेक्सच्या संचालिका डॉ.अपर्णा कुटे, तहसिलदार डॉ.शिवाजी मगर, मुख्याधिकारी डॉ.आशिष बोबडे, पोलीस निरीक्षक सुनील जाधव, तरूणाईचे अध्यक्ष नारायण पिठोरे, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस, वनपरिक्षेत्र अधिकारी सलीम खान यांची प्रमुख उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)

वृक्ष दिंडी व वृक्षारोपण!
सर्वप्रथम आदिवासी परंपरेप्रमाणे महिलांनी ना.डॉ.संजय कुटे यांचे औक्षण केले आणि वृक्षदिंडीला प्रारंभ झाला. यावेळी गोंधह, भजन व पावली टाकत वृक्षदिंडीची वाटचाल करण्यात आली. स्वत: ना.डॉ.संजय कुटे व त्यांच्या पत्नी डॉ.अपर्णा कुटे यांनी वृक्षपालखी खांद्यावर घेतल्याने सर्वांमध्ये उत्साह संचारला.


रेनवॉटर हार्वेस्टींग उपक्रम राबवा
जळगाव व संग्रामपूर तालुक्यात जमिनीत मोठ्या प्रमाणावर पाणी जिरविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. केंद्राच्या जलशक्ती विभाग येथे पायलट प्रोजेक्ट राबवित आहे. त्याला प्रतिसाद देत रेनवॉटर हार्वेस्टींग उपक्रम प्रथम शासकीय कार्यालयांनी व नंतर जनतेनी राबवावा, ही सुध्दा एक लोकचळवळ बनावी, असे मत ना.डॉ.संजय कुटे यांनी व्यक्त केले.

Web Title: Peoples Movement requires creation of forests - Sanjay Kute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.