ठिबक सिंचनद्वारे मिरचीची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:08+5:302021-06-16T04:46:08+5:30
धामणगाव धाड : येथील शेतकरी मधुकर जंजाळ यांनी आपल्या शेतातील पेरूच्या बागेत आंतरपीक म्हणून मल्चिंग पेपरवर ठिबक सिंचनद्वारे मिरचीची ...
धामणगाव धाड : येथील शेतकरी मधुकर जंजाळ यांनी आपल्या शेतातील पेरूच्या बागेत आंतरपीक म्हणून मल्चिंग पेपरवर ठिबक सिंचनद्वारे मिरचीची लागवड केली आहे. या परिसरातील अनेक शेतकरी अशा प्रकारचे उत्पन्न घेत आहेत.
प्रकल्पबाधितांच्या सर्व्हेचे काय?
मेहकर : तालुक्यातील पेनटाकळी मध्यम प्रकल्पाच्या पाझरणाऱ्या पाण्यामुळे २०१२ पासून काही गावांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. सर्व्हे करून मदत देण्याची मागणी आ. रायमुलकर यांनी केली होती. सर्व्हेचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खरेदीसाठी बाजारात उडाली झुंबड
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : अनलाॅक करताच बाजारपेठेत नागरिकांची झुंबड उडाल्याचे चित्र महेकर शहरात दिसून येत आहे. विविध वस्तू व साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजार परिसरात गर्दी होत आहे. येथील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूने दुकाने लावली जात आहेत.