बौद्ध व मुस्लिम धर्मीयांची टक्केवारी जवळपास सारखीच!

By admin | Published: August 28, 2015 12:13 AM2015-08-28T00:13:33+5:302015-08-28T00:13:33+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील धर्मनिहाय जनगणना ; हिंदूंचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ७१ टक्के.

The percentage of Buddhist and Muslim men is almost the same! | बौद्ध व मुस्लिम धर्मीयांची टक्केवारी जवळपास सारखीच!

बौद्ध व मुस्लिम धर्मीयांची टक्केवारी जवळपास सारखीच!

Next

खामगाव : सन २0११ मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेतील लोकसंख्येची धर्मनिहाय आकडेवारी भारताच्या रजिस्टार जनरल आणि सेन्सस कमिश्नर कार्यालयाने मंगळवारी जाहीर केली. या आकडेवारीची माहिती जिल्हा व तालुकानिहाय संकेत स्थळावर उपलब्ध असून, बुलडाणा जिल्ह्यात बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज यांचा टक्का जवळपास सारखाच असल्याचे समोर आले. सन २00१ नंतर २0११ यामध्ये जनगणना करण्यात आली होती. २0११ च्या जनगणनेनुसर, बुलडाणा जिल्ह्याची लोकसंख्या ही २५ लाख ८६ हजार २५८ एवढी नोंदविली. यामध्ये ७१.३५ टक्के लोकसंख्या ही हिंदू धर्माची असून, आकड्यांमधील ही संख्या १८ लाख ४५ हजार ४२४ एवढी आहे. त्या खालोखाल बौद्ध समाज व मुस्लिम समुदायाची टक्केवारी आहे. या दोन्ही समाजामधील टक्केवारीचा फरक केवळ 0.३९ एवढा आहे. बौद्ध धर्माची टक्केवारी ही १४.0८ असून, एकूण लोकसंख्या ३ लाख ६४ हजार २२९ एवढी आहे. मुस्लिम समाजाची टक्केवारी १३.६९ टक्के असून, ही संख्या ३ लाख ५४ हजार २३६ एवढी झाली आहे. जैन धर्मीयांची टक्केवारी 0.४७ एवढी असून, लोकसंख्या १२ हजार २४२ आणि ख्रिश्‍चन धर्मीयांचा टक्का हा 0.१३ एवढा आहे. जिल्ह्यात ३ हजार ५३१ ख्रिश्‍चन बांधव असल्याची नोंद या धर्मनिहाय जणगणनेत करण्यात आली आहे. शीख समुदायाचा टक्का हा एकूण लोकसंख्येच्या 0.0६ एवढा असून, १ हजार ६६८ शीख बांधव जिल्ह्यात नोंदविले आहेत. इतर धर्माचे ५२२ नागरिक जिल्ह्यात असून त्यांचा टक्का 0.0२ एवढा आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ४ हजार ४0६ नागरिकांनी आपल्या धर्माची नोंद जनगणनेसाठी दिलेली नाही. हा टक्का 0.१७ एवढा आहे. या आकडेवारीची आता तालुका व शहर पातळीवर विश्लेषण राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांंना विविध योजनांसाठी लाभदायक होणार आहे.

सर्वाधिक लोकसंख्या खामगाव तालुक्यात

         जनगणनेनुसार, जिल्ह्यातील सर्वाधिक खामगाव तालुक्यात ३ लाख २0 हजार ६४४ एवढी लोकसंख्या नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल बुलडाणा तालुक्यात २ लाख ८६ हजार ९९२ नागरिक असून, चिखलीत २ लाख ८५ हजार ३२१ नागरिकांची नोंद आहे. सर्वांंत कमी लोकसंख्या ही देऊळगाव राजा तालुक्यात १ लाख २५ हजार ३५0 नागरिकांची नोंद या जनगणनेत झाली आहे.

Web Title: The percentage of Buddhist and Muslim men is almost the same!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.