सर्व बसस्थानकांवर रॅपिड चाचणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:32 AM2021-04-15T04:32:27+5:302021-04-15T04:32:27+5:30

निंबाजी पांडव यांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क डोणगाव : बुलडाणा जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात ...

Perform rapid test at all bus stops | सर्व बसस्थानकांवर रॅपिड चाचणी करा

सर्व बसस्थानकांवर रॅपिड चाचणी करा

googlenewsNext

निंबाजी पांडव यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोणगाव : बुलडाणा जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे़. काेराेना संसर्ग राेखण्यासाठी व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्हावे म्हणून जे प्रवासी बसने प्रवास करतात, अशा सर्वच प्रवाशांना रॅपिड चाचणी करूनच बसमध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी मेहकर पंचायत समितीचे सभापती निंबाजी पांडव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे़. यासाठी जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांवर पोलिओ बुथप्रमाणे कोरोना तपासणी बुथ लावून सक्तीने प्रवाशांची तपासणी करावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे़.

सध्या बुलडाणा जिल्ह्यात दररोज माेठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत़. अशातच बसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात व संपर्कात येतात़. त्यांची तपासणी बसमध्ये बसण्यापूर्वी केल्यास कोरोना रुग्णाचा शोध घेतला जाऊ शकतो़. त्यामुळे त्वरित प्रत्येक बसस्थानकावर कोरोना चाचणी बुथ लावून दररोज प्रवास करणाऱ्यांची तपासणी करावी, अशी मागणी पांडव यांनी केली आहे़.

Web Title: Perform rapid test at all bus stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.