ढालसावंगी वन क्षेत्रात महामार्ग कामासाठी परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 11:33 AM2021-06-15T11:33:55+5:302021-06-15T11:34:00+5:30

Buldhana News : ४़ ८४४ हेक्टर वनक्षेत्रावरील कामास वन विभागाने परवानगी दिली आहे.

Permission for highway work in Dhalsawangi forest area | ढालसावंगी वन क्षेत्रात महामार्ग कामासाठी परवानगी

ढालसावंगी वन क्षेत्रात महामार्ग कामासाठी परवानगी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : चिखली – हातणी-धाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एम या रस्त्याकरीता बुलडाणा वन विभागातील मौजे ढालसावंगी ता. बुलडाणा येथील ४़ ८४४ हेक्टर वनक्षेत्रावरील कामास वन विभागाने परवानगी दिली आहे. ही वनजमीन वळतीकरण प्रस्तावास केंद्र शासनाची तत्वत : मंजुरी प्राप्त झालेली आहे. तसेच केंद्र शासनाकडील ७ मे २०१५ च्या पत्रातील मार्गदर्शक सुचनांना विचारात घेवून राज्य शासनाने १ जुलै २०१५ चे परिपत्रकान्वये अटी व शर्तींचा अधिन राहून प्रकल्प यंत्रणेस बुलडाणा वनविभागातील एकूण ४.८४४ हेक्टर प्रकल्प बाधीत वनक्षेत्रातील केंद्र शासनाकडून मंजुरी प्राप्त आहे.
मंजूरी प्राप्त असलेल्या अमरावती वन वृत्तातील बुलडाणा वन विभागातील ४.८४४हेक्टर वनक्षेत्रावरील एकूण ५९२ वृक्षांची तोड करून वळतीकरण केलेल्या वनक्षेत्राचे मर्यादेत प्रकल्पाची कामे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.यासाठी केंद्र शासनाने सदर प्रकल्पास वन संवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत अटी नमूद करून तत्वत: मान्यता प्रदान केली आहे. मंजूर केलेल्या वन क्षेत्रातच प्रकल्प यंत्रणा म्हणून वनक्षेत्रात काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रकल्प यंत्रणेकडून केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या नमूद कोणत्याही अटींचा भंग करण्यात येवू नये. तसे केल्यास प्रकल्पाचे काम थांबविण्यात येईल याची नोंद घ्यावी. प्रकल्प बाधीत वनक्षेत्रातील वृक्षतोडीचे कामे सुरू करतांना सदरची कामे वनखात्याच्या विहीत कार्य पद्धतीनुसार खात्यामार्फत करण्यात येणार आहे, असे उपवनसंरक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Web Title: Permission for highway work in Dhalsawangi forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.