ढालसावंगीजवळील वनक्षेत्रात महामार्ग कामासाठी परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:45 AM2021-06-16T04:45:53+5:302021-06-16T04:45:53+5:30

मंजुरीप्राप्त असलेल्या अमरावती वनवृत्तातील बुलडाणा वनविभागातील ४.८४४ हेक्टर वनक्षेत्रावरील एकूण ५९२ वृक्षांची तोड करून वळतीकरण केलेल्या वनक्षेत्राचे मर्यादेत प्रकल्पाची ...

Permission for highway work in forest area near Dhalsawangi | ढालसावंगीजवळील वनक्षेत्रात महामार्ग कामासाठी परवानगी

ढालसावंगीजवळील वनक्षेत्रात महामार्ग कामासाठी परवानगी

Next

मंजुरीप्राप्त असलेल्या अमरावती वनवृत्तातील बुलडाणा वनविभागातील ४.८४४ हेक्टर वनक्षेत्रावरील एकूण ५९२ वृक्षांची तोड करून वळतीकरण केलेल्या वनक्षेत्राचे मर्यादेत प्रकल्पाची कामे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

यासाठी केंद्र शासनाने सदर प्रकल्पास वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत अटी नमूद करून तत्त्वत: मान्यता प्रदान केली आहे. मंजूर केलेल्या वनक्षेत्रातच प्रकल्प यंत्रणा म्हणून वनक्षेत्रात काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रकल्प यंत्रणेकडून केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या नमूद कोणत्याही अटींचा भंग करण्यात येऊ नये. तसे केल्यास प्रकल्पाचे काम थांबविण्यात येईल याची नोंद घ्यावी. प्रकल्पबाधित वनक्षेत्रातील वृक्षतोडीचे कामे सुरू करताना सदरची कामे वनखात्याच्या विहीत कार्यपद्धतीनुसार खात्यामार्फत करण्यात येणार आहे, असे उपवनसंरक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

Web Title: Permission for highway work in forest area near Dhalsawangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.