दारूमुक्त मातृतीर्थ  जिल्हय़ासाठी पेटली मशाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:41 AM2017-10-04T00:41:51+5:302017-10-04T00:42:13+5:30

चिखली: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने स्वातंत्र्यप्रा प्तीसाठी कोट्यवधी भारतीयांच्या मनातील यज्ञकुंड प्रज्वलीत  झाले. त्याच महामानवाच्या जयंती दिनी मातृतीर्थ बुलडाणा  जिल्हय़ाला दारूपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी मशाल  प्रज्वलित केली असून, जिजामातेच्या पावन स्पर्शाने पुनित या  जिल्ह्यातून लवकरच दारू हद्दपार होईल, असा विश्‍वास  दारूमुक्ती निर्धार परिषदेच्यावतीने आयोजित मशाल मोर्चात  हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष अँड.  वृषाली बोंद्रे यांनी व्यक्त केला. 

Petal Turbine for Mother-Free District | दारूमुक्त मातृतीर्थ  जिल्हय़ासाठी पेटली मशाल

दारूमुक्त मातृतीर्थ  जिल्हय़ासाठी पेटली मशाल

Next
ठळक मुद्देदारूमुक्ती निर्धार परिषदेच्यावतीने काढण्यात आला मशाल  मोर्चामोर्चात महिलांचा लक्षणीय सहभागजिल्ह्यातून लवकरच दारू हद्दपार होईल, असा ठाम विश्‍वास 

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने स्वातंत्र्यप्रा प्तीसाठी कोट्यवधी भारतीयांच्या मनातील यज्ञकुंड प्रज्वलीत  झाले. त्याच महामानवाच्या जयंती दिनी मातृतीर्थ बुलडाणा  जिल्हय़ाला दारूपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी मशाल  प्रज्वलित केली असून, जिजामातेच्या पावन स्पर्शाने पुनित या  जिल्ह्यातून लवकरच दारू हद्दपार होईल, असा विश्‍वास  दारूमुक्ती निर्धार परिषदेच्यावतीने आयोजित मशाल मोर्चात  हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष अँड.  वृषाली बोंद्रे यांनी व्यक्त केला. 
दारूमुक्त निर्धार परिषदेच्यावतीने चिखली येथे छत्रपती  शिवरायाच्या पुतळयाला वंदन करून तर बुलडाणा येथे महत्मा  गांधी यांच्या पुतळयाला वंदन करून २ ऑक्टोबर रोजी  सायंकाळी जिल्हाभर सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्था,  संघटना आणि दारूबंदीसाठी झटणार्‍या महिलांचा मशाल मार्च  काढण्यात आला. 
चिखली येथे अँड. वृषाली बोंद्रे व मृणाली सपकाळ यांच्या नेतृ त्वात हा मशाल मार्च काढण्यात आला होता. प्रमुख रस्त्याने  घोषणा देत ही दारूमुक्तीची चळवळ लोकांपर्यंत पोहचविण्याचा  प्रयत्न सहभागी असलेल्या महिला व पुरुषांनी केले. या मोर्चात  महत्मा गांधी की जय, मातृतीर्थ जिल्हा दारूमुक्त झालाच पाहिजे  सारखे नारे देण्यात आले.              चिखली येथील मशाल  मोर्चात जि.प. सदस्य ज्योती पडघान, भारती बोंद्रे, शोभा सवड तकर, ज्योती बियाणी, शिल्पा लढ्ढा, संगीता गाडेकर, शालिनी  थोरात, सुनीता शिंगणे, उषा डुकरे, करुणा बोंद्रे, विद्या देशमाने,  वनिता साखळकर, शोभा चव्हाण, सीमा चित्ते, शोभा सपकाळ,  गीता भोजवानी, वंदना पोपट, कीर्ती सिसोदिया, वंदना इंगळे,  कौसर खान, चवरे, मनीषा भुते, जयश्री देशमाने, पळसकर, छानू  श्रीवास्तव, निहा खरात, अनिता घुगे, संगीता गायकी, शालिनी  वानखेडे, प्रमिला जाधव, हिरकणी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्या,  विविध संस्था, संघटनेचे पदाधिकार्‍यांसह तालुक्यातील अनेक  गावातील महिला व नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. 

Web Title: Petal Turbine for Mother-Free District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.