बुलडाणा जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 09:22 PM2020-03-19T21:22:27+5:302020-03-19T21:23:31+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद राहणार नाहीत.

Petrol pump in Buldana district will not closed | बुलडाणा जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद नाही

बुलडाणा जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद नाही

googlenewsNext
बुलडाणा: जिल्ह्यात गर्दीची ठिकाणे टाळण्यासाठी ‘नो गॅदरींग’चा आदेश असला तरी जिल्ह्यातील पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले आहेत, असा कुठलाही आदेश जिल्हा प्रशासनाने काढलेला नाही. ती एक निव्वळ अफवा असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. राजाराम पुरी यांनी स्पष्ट केल आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पेट्रोलपंप कोरोना संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून बंद ठेवण्यात आले असल्याची अफवा सध्या जिल्ह्यात फिरत आहे. त्या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. राजाराम पुरी यांना विचारणा केली असता असा कुठलाही आदेश जिल्हा प्रशासनाने काढलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे ही आवाहन त्यांनी केले आहे. जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद ठेवण्याबाबत कुठलेही आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेले नाहीत. पेट्रोल पंप बंद राहणार असल्याबाबत अफवा पसरवली जात आहे. या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पेट्रोल पंप बंद असणार नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्या गोष्टी ३१ मार्च पर्यंत बंद करायच्या आहेत, त्याच्या संदर्भातील आदेश काढण्यात आले आहेत. त्यात पेट्रोलपंपाचा समावेश नाही.  त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, असे ही डॉ. पुरी यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Petrol pump in Buldana district will not closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.