शेगावातील दारूबंदीची याचिका खारीज!
By admin | Published: March 10, 2016 02:00 AM2016-03-10T02:00:34+5:302016-03-10T02:00:34+5:30
नगराध्यक्षांनी दाखल केली होती याचिका.
शेगाव : संतनगरी शेगावात कायमची दारूविक्री बंद व्हावी यासाठी शेगाव नगर पालिकेने विशेष सभेव्दारे ठराव पारित केला होता. याशिवाय शेगावच्या नगराध्यक्षा सौ.शारदा कलोरे यांनी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
मात्र या याचिकेवर सुनावणी करतांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने ही याचिका खारीज केली आहे.
दोन महिन्यांपूर्वी शेगाव शहरात कायमची दारूविक्री बंदी व्हावी यासाठी निवेदनांचे आंदोलन छेडण्यात आले होते आणि या निवेदनांवर शहर हद्दीत दारू बंदी करण्याचा ठराव नगर पालिकेच्या सभेत घेण्यात आला होता. या सभेच्या वैधतेवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे काँग्रेस पक्षाच्या काही नगरसेवकांनी दाद मागितली होती.
या प्रकरणांवर निकाल येणे असून या दरम्यान नगराध्यक्षा सौ.शारदा कलोरे यांनी शेगाव शहरात दारूबंदीसाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
या निकालावर बुधवारी न्यायमूर्ती ङ्म्रीमती वासंती नाईक व व्ही.एन.देशपांडे यांनी निकाल देत सदर याचिका खारीज केली आहे.