फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे लक्ष द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 11:49 PM2017-09-27T23:49:34+5:302017-09-27T23:52:36+5:30
गाव पातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर फार्मसिस्ट हा महत्वाचा घटक बनला आहे. डॉक्टरांच्याच इतके फार्मसिस्टला महत्व आले आहे. त्यामुळे फार्मसिच्या अभ्यासक्रमाला अलिकडच्या काळात अधिक महत्व आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : गाव पातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर फार्मसिस्ट हा महत्वाचा घटक बनला आहे. डॉक्टरांच्याच इतके फार्मसिस्टला महत्व आले आहे. त्यामुळे फार्मसिच्या अभ्यासक्रमाला अलिकडच्या काळात अधिक महत्व आले. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी, एकाग्रतेने मन लावून अभ्यास करावा. प्रयत्नांती यश मिळतेच. भविष्यात निराश न होता विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे अधिक लक्ष द्यावे, असे प्रतिपादन किशोरीताई भोयर कॉलेज आॅफ फार्मसी कामठी येथील अधिव्याख्याता डॉ. अरुण पाटील यांनी केले.
डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, वैनगंगा शैक्षणिक परिसर येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड फार्मसिस्ट डे कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील डीपारमेंट फार्मास्यटीकल सांयन्सचे प्रो. डॉ. प्रफुल्ल सावळे, भंडारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उके, जि.प. भंडारा चीफ फार्मसी अधिकारी प्रभाकर कळंबे, जिल्हा सामान्य रूग्णालय मुख्य फार्मसी अधिकारी अरविंद बावनकर, साकोली तालुका औषध विक्री संघटनेचे वरिष्ठ सदस्य शरद गुप्ता, एलएमसी सदस्य लोकनाथ नवखरे आणि बाजीराव करंजेकर कॉलेज आॅफ फार्मसी साकोलीचे प्राचार्य डॉ. दामोदर गौपाले, कार्यक्रम समन्वयक तुळसीदास निंबेकर उपस्थित होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पोस्टर्स स्पर्धा, रक्तदान शिबिर, नागरिकांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणीसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय फार्मसी विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्येची देवता शारदा या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मान्यवरांचे हस्ते वैज्ञानिक संशोधक पुस्तकाचे विमोचन करण्यात आले तर तालुक्यातील उत्कृष्ट फार्मेसिस्ट म्हणून गोंडउमरी येथील नितीन वेगड, साकोली येथील प्रकाश गजापुरे, उत्कृष्ठ फार्मसी अधिकारी म्हणून खांबा पीएससीचे सचिन रिनाईत, एकोडी पीएचसीचे सुधांशू नोरे आणि महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी श्वेता जवंजाळ, तन्मयी हटवार, सुधीर कटरे, सागर पाजनकर या सर्वांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमात स्थानिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह, आमगाव, देवरी, वरठी, कामठी आणि बिलासूपर येथील फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दामोधर गौपाले यांनी केले. संचालन पूजा हेमणे, काजल लिल्हारे यांनी केले. तर आभार प्रा. अनिल साव यांनी मानले. सदर कार्यक्रम बाजीरावजी करंजेकर कॉलेज आॅफ फार्मसी, साकोली तालुका केमिस्ट अॅन्ड ड्रगीस्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र फार्मसी आॅफिर्सस असोसिएशन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.