गीतेमध्ये समस्त मानवांच्या जीवन विकासाचे तत्त्वज्ञान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:27 AM2017-08-26T00:27:20+5:302017-08-26T00:27:47+5:30
गीता ही कोणत्याही धर्माची नसून, समस्त मानव समाजाच्या विकासाचा मार्ग त्यामध्ये दिला आहे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, हाच संदेश गीतेतून मिळतो. संपूर्ण जगातील मानवी जीवन सुखी व समृद्ध करण्याचा मार्ग गीता दर्शवित असल्याचे मत अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष तथा श्री आचार्य लोणारकर मोठे बाबा महानुभाव यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गीता ही कोणत्याही धर्माची नसून, समस्त मानव समाजाच्या विकासाचा मार्ग त्यामध्ये दिला आहे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, हाच संदेश गीतेतून मिळतो. संपूर्ण जगातील मानवी जीवन सुखी व समृद्ध करण्याचा मार्ग गीता दर्शवित असल्याचे मत अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष तथा श्री आचार्य लोणारकर मोठे बाबा महानुभाव यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्री क्षेत्र जाळीचा देव विद्यमाने सर्वज्ञ चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव व राज्यस्तरीय श्रीमद् भगवतगीता ज्ञानस्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण २४ ऑगस्ट रोजी श्री गोपाल आश्रम, पंचकृष्ण मंदिर, अजिंठा रोड येथे पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य लोणारकर मोठे बाबा महानुभाव होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाथ्रीकरबाबा, मेहकरकर बाबा मढ आश्रम, लासूरकर बाबा जाळीचा देव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. सोनपेठकरबाबा, माजी आमदार विजयराज शिंदे, गोविंदशेठ अग्रवाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राज्यस्तरीय भगवतगीता स्पर्धेतील गीतेतील १ ते ९ अध्यायातील पहिले बक्षीस न्यू ईरा हायस्कूल, जळगाव जामोद येथील आशीष राजगुरे, द्वितीय श्री सर्मथ स्कूल वाशिम येथील हर्षदा रवींद्र ढोणे, तृतीय नगर जिल्हय़ातील ओम गुरुदेव माध्यमिक गुरुकुलमधील इनामदार दाऊद गफूर, दत्तमंदिर हुडको, जि. नगर येथील गोविंद प्रभाकर केसकर, शिक्रापूर पुणे येथील अश्विनी नितीन सायज यांना देण्यात आले. तसेच गीतेतील १0 ते १८ अध्यायातील दुसर्या भागातील पहिले बक्षीस सचिन संजय धवने, द्वितीय योगिता नरेंद्र सव्वालाखे, तृतीय हर्षद रवींद्र बोडखे, तृतीय दामिनी वसंतराव खोडके, ऋतुजा संजय सराफ यांना देण्यात आले.
यावेळी पाथ्रीकरबाबा, मेहकरकर बाबा मढ आश्रम, लासूरकर बाबा जाळीचा देव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. सोनपेठकरबाबा यांनी मार्गदर्शन केले.
संचालन धनंजयदादा लोणारकर व प्रवीणदादा लोणारकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गोविंदशेठ अग्रवाल यांनी केले. यावेळी संपूर्ण राज्यभरात भाविक दाखल झाले होते.