डाेणगावात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:36 AM2021-05-27T04:36:14+5:302021-05-27T04:36:14+5:30
डोणगांव : काेराेना रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले असून जीवनाश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ ...
डोणगांव : काेराेना रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले असून जीवनाश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ दरम्यान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे़ डाेणगाव येथे जीवनावश्यकसह इतरही दुकाने सुरू ठेवण्यात येत असून दुकानांमध्ये माेठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे़ फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत नसल्याने काेराेनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे़
बुलडाणा जिल्ह्यात २० मेनंतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक व भाजीपाला विक्री व इतर अत्यावश्यक सेवेतील दुकानांना उघडण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे़ मात्र, डोणगांव येथे सध्या अत्यावश्यक सेवेव्यतिरीक्त सर्वच दुकाने उघडी राहत असल्याने नागरिकांची दुकानांमध्ये ग्राहकांचा वावर वाढला आहे़ डोणगांव येथे सर्रास कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे़ त्यामुळे पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. डोणगांव येथे सकाळी सर्वच दुकाने उघडण्यात येत आहे़ त्यामुळे नागरिक खरेदीच्या नावाखाली सर्रास गर्दी करताना दिसून येत आहे़ याकडे स्थानिक कोविड दक्षता समितीचे दुर्लक्ष होत असल्याने डोणगांव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे़ एकीकडे आरोग्य विभाग कोरोना चाचण्या घेऊन रुग्ण शोधत असताना डोणगांव येथे मात्र सर्रास दुकानांमध्ये गर्दी हाेत आहे़ त्यामुळे, फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे़