पोलीस भरतीत आवश्यक तेवढ्याच उमेदवाराची शारीरिक चाचणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 01:28 PM2019-03-06T13:28:25+5:302019-03-06T13:28:41+5:30
बुलडाणा: पोलीस भरती प्रक्रियेतील नव्या बदलामुळे आता लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर शारीरिक चाचणी होणार आहे. त्यानंतर आवश्यक तेवढ्याच उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविले जाणार आहे.
बुलडाणा: पोलीस भरती प्रक्रियेतील नव्या बदलामुळे आता लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर शारीरिक चाचणी होणार आहे. त्यानंतर आवश्यक तेवढ्याच उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविले जाणार आहे. भरती प्रक्रियेतील या बदलाने उमेदवारांचा फायदा होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली.
महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाºयांच्या कामाच्या स्वरुपात बदल झालेला असल्याने पोलीस शिपाई पदावर हुशार उमेदवारांची निवड होण्याची आवश्यकता आहे. पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी दरम्यान होणाºया दुर्घटना याबाबी विचारात घेऊन शासनाने १८ जानेवारी रोजी पत्रानुसार भरती प्रक्रियेत बदल केलेला आहेत. नवीन पध्दतीमुळे पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची लेखी परीक्षा प्रथम घेण्यात येणार आहे. लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणाºया पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढ्याच योग्य उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात येणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया दिर्घकाळ सुरु न राहता जलद गतीने पार पडेल. जिल्ह्याबाहेरीत उमेदवारांना जास्त दिवस ताटकळत रहावे लागणार नाही. भरती प्रक्रियेत केलेल्या बदलाचा फायदा उमेदवारांना निश्चित होईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली आहे.