पिंपळखुटा खु. गावासाठी टँकर मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:25 AM2021-06-01T04:25:59+5:302021-06-01T04:25:59+5:30

पाणीटंचाई निवारणार्थ २० विंधन विहिरी बुलडाणा : पाणीटंचाई निवारणार्थ मेहकर तालुक्यातील १४, लोणार तालुक्यातील ४ गावांसाठी २० विंधन ...

Pimpalkhuta Khu. Tanker sanctioned for the village | पिंपळखुटा खु. गावासाठी टँकर मंजूर

पिंपळखुटा खु. गावासाठी टँकर मंजूर

Next

पाणीटंचाई निवारणार्थ २० विंधन विहिरी

बुलडाणा : पाणीटंचाई निवारणार्थ मेहकर तालुक्यातील १४, लोणार तालुक्यातील ४ गावांसाठी २० विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. एकूण २० गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. विंधन विहिरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे.

विंधन विहिरी मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख, हिवरा खु., पिंपळगाव उंडा, माळेगाव, वर्दडा, पेनटाकळी, अंबाशी, मोहखेड, पारखेड, उटी, नायगाव देशमुख, शेंदला, लव्हाळा, चिंचाळा, लोणार तालुक्यातील शिवणी पिसा, नांद्रा, सुलतानपूर व गोवर्धननगर या गावांसाठी मंजूर करण्यात आली आहे. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Web Title: Pimpalkhuta Khu. Tanker sanctioned for the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.