पिंप्रीत साजरा झाला नाही पोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:16 PM2017-08-21T23:16:25+5:302017-08-21T23:27:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार : नजीकच्या पिंप्री अवगण येथे गेल्या आठ दिवसात फºयासदृश आजाराने जवळपास ११ गुरे दगावली असून आणखी पाच जनावरांना या आजाराची लागण झालेली आहे. या आजाराचा फैलाव होवू नये म्हणून सोमवारी पोळा सण साजरा करण्यात आला नाही.
पिंप्री अवगन येथे फºया आजाराची लागन झाल्याने बळीराजाने पोळा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने २१ आॅगस्ट रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या वृत्ताची दखल घेवून तहसिलदार वाहूरवाघ व पशूधन विभागाच्या अधिकाºयांनी सोमवारी पिंप्री येथे भेट देवून शेतकºयांशी संवाद साधला. पशूधन विकास अधिकाºयांना फºया सदृश आजाराने ग्रस्त जनावरांवर योग्य उपचार करण्याचे आदेश कर्मचाºयांना दिलेत.
मानोली पशूधन चिकित्सालय अंतर्गत येत असलेल्या पिंप्री अवगण येथे या केंद्रांतर्गत जनावरांची संख्या सर्वाधिक आहे. याच गावात मागील काही दिवसांपासून फºयासदृश आजाराने ११ जनावरांचा बळी घेतला आहे. अन्य बैलांना व जनावरांना या आजाराची लागण होऊ नये म्हणून पोळा सण साजरा न करण्याचा निर्णय पशूपालकांनी घेतला. सोमवारी तहसीलदारांसह पशुसंवर्धन अधिकाºयांनी भेट दिली असता, पोळा सणानिमित्त एका बैलाची पूजा केली आणि संबंधित पशुसंवर्धन कर्मचाºयांना जातीपुर्वक लक्ष देण्याच्या सुचना केल्या.
आमदार पाटणी यांनी घेतली दखल
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेवून आमदार राजेंद्र पाटणी यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली व प्रभारी पशुसंवर्धन अधिकारी जयश्री केंद्रे यांना फोन करुन पिंप्री येथील प्रकरणाकडे लक्ष घालून योग्य औषध पुरवठा करण्याच्या सुचना दिल्या. सदर आजारावर आवश्यक असलेले औषध पशूधन विकास विभागाकडे उपलब्ध नसल्याने पशुपालकांना खाजगी मेडीकलवरुन विकत आणावे लागत आहे. त्यामुळे शेतकºयांना दुष्काळी परिस्थितीत भुर्दंड सहन करावा लागत आहे.