पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटली; खामगाव शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 05:04 PM2018-03-05T17:04:16+5:302018-03-05T17:04:16+5:30
खामगाव: शहराला पाणी पुरवठा करणाºया मुख्य पाईपलाईनला सारोळा शिवारातील नदीपात्रात गळती लागली. परिणामी, शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याचे संकेत आहे
खामगाव: शहराला पाणी पुरवठा करणाºया मुख्य पाईपलाईनला सारोळा शिवारातील नदीपात्रात गळती लागली. परिणामी, शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, ही पाईपलाईन दुरूस्त करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
खामगाव शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील गेरू माटरगाव येथील धरणावरून जळका भंडग येथील जलशुध्दीकरण प्रकल्पापर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली आहे. सुमारे २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या या पाईपलाईनला सोमवारी सारोळा शिवारातील नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गळती लागली. या गळतीमुळे हजारो गॅलन पाणी वाया गेले. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पाईपलाईन दुरूस्तीसाठी व्यत्यय निर्माण झाला आहे. दरम्यान, नदीपात्रातील पाणी उपसून पाईपलाईन दुरूस्तीसाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी पाणी पुरवठा अभियंता नीरज नाफडे, पर्यवेक्षक सुरज ठाकूर यांच्यासह पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पाणी वाटपाच्या वेळापत्रकात बदल!
पाणी पुरवठा करणाºया पाईपलाईनला मोठी गळती लागल्याने, खामगाव शहरातील पाणी वितरणाच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शहराचा पाणी पुरवठा लांबणीवर पडणार असल्याचे दिसून येते. पाईपलाईन दुरूस्त झाल्यानंतरच शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती आहे.