कारंजी नव्हे... मेहकर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 19:13 IST2020-12-25T17:49:13+5:302020-12-25T19:13:25+5:30
Pipeline Burst at Mehkar मोठ्या दाबाने हे पाणी येत असल्याने जलवाहिनीतून पाण्याचा उंच कारंजा उडाला होता.

कारंजी नव्हे... मेहकर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली
मेहकर: कोराडी प्रकल्पावरून मेहकर शहरास पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी २५ डिसेंबर रोजी रस्त्याचे काम करत असताना फुटल्याने परिसरात पाणीच पाणी झाले होते. सोबतच मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्य झाला.
शुक्रवारी दुपारी रस्ता काम करताना ही जलवाहिनी फुटली. रस्त्याचे काम करत असताना मोठ्या यंत्राचा या जलवाहिनीस धक्का लागल्याने ती फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्य झाला. तसेच मोठ्या दाबाने हे पाणी येत असल्याने जलवाहिनीतून उपाण्याचा उंच कारंजा उडाला होता. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याने कोराडी प्रकल्पावरून होणारा पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला. परिणामी प्रसंगी मेहकर शहरता एखाद दोन दिवसांसाठी निर्जळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिकेने त्वरित या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पावले उचलली आहेत.