दिवंगत माजी आमदारांच्या घरातून पिस्तूल गायब; खामगाव शहरात एकच खळबळ
By अनिल गवई | Updated: April 24, 2024 20:25 IST2024-04-24T20:25:11+5:302024-04-24T20:25:55+5:30
खामगाव शहरातील चिंतामणी मंदिराजवळील केशव नगरात माजी आमदार माणिकराव गावंडे यांचे निवासस्थान आहे.

दिवंगत माजी आमदारांच्या घरातून पिस्तूल गायब; खामगाव शहरात एकच खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : माजी आमदार दिवंगत माणिकराव गावंडे यांच्या खामगाव येथील घरातून अमेरिकन बनावटीची एक पिस्तूल गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणी केलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, खामगाव शहरातील चिंतामणी मंदिराजवळील केशव नगरात माजी आमदार माणिकराव गावंडे यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानात परवाना असलेली अमेरिकन बनावटीची एक पिस्तूल होती. ही पिस्तूल कोणीतरी चोरून नेल्याची तक्रार त्यांच्या पत्नी कोकिळाबाई गावंडे (७३) यांनी शहर पोलिसात दिली. शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंवि कलम ३८०, ४५४, ४५७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण नाचनकर करीत आहेत.