शहरातील रस्त्यांवर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:41 AM2021-09-17T04:41:27+5:302021-09-17T04:41:27+5:30
-- रस्त्यावरील पार्किंगकडे कानाडोळा बुलडाणा : बुलडाणा शहरात वाहतुकीचे नियम सर्रास तोडले जात आहेत. यासोबतच शहरातील प्रतिष्ठानासमोर कुठेही पार्किंग ...
--
रस्त्यावरील पार्किंगकडे कानाडोळा
बुलडाणा : बुलडाणा शहरात वाहतुकीचे नियम सर्रास तोडले जात आहेत. यासोबतच शहरातील प्रतिष्ठानासमोर कुठेही पार्किंग झोन उपलब्ध नसून, शहरात रस्त्यावरच पार्किंग केली जात आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तर दुसरीकडे क्षुल्लक कारणावरून वादही उद्भविण्याचे प्रसंग शहरात घडले आहेत. तेव्हा संबंधित विभागाने शहरातील पार्किंगच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
--
अवैध गुटखा विक्री वाढली
बुलडाणा : संपूर्ण राज्यात गुटखा बंदी असतानाही जिल्ह्यात सर्वत्र पान टपऱ्यांवर गुटखा मिळत असल्याचे चित्र बुलडाणा शहरात दिसून येत आहे. तेव्हा जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरात गुटखा बंदीचा फज्जा उडाला असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे विकल्या जाणारा गुटखा हा चढ्या भावाने विकला जात असून, अनेक जण यामधून मालामाल होत असल्याचे दिसून येत आहे.
पुलांची उंची वाढविण्याची गरज
बुलडाणा : जिल्ह्यातील असंख्य पुलांचे बांधकाम रखडलेले असतानाच आहे त्या पुलांची उंची वाढविण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वडाळी ते मांडवा या रस्त्यावरील अनेक पुलांची उंची कमी असून, यामुळे पावसाळ्यात या पुलांवरून पाणी वाहत असते.