शहरातील रस्त्यांवर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:36 AM2021-08-22T04:36:53+5:302021-08-22T04:36:53+5:30
बुलडाणा : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरातील अंतर्गंत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेले असून, यामुळे वाहनधारकांना वाहन चालवितांना मोठी कसरत ...
बुलडाणा : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरातील अंतर्गंत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेले असून, यामुळे वाहनधारकांना वाहन चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे सध्या पावसात या खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून, खड्डा कोठे याचा अंदाज न आल्याने अनेक अपघातही घडत आहेत. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अवैध गुटखा विक्री वाढली
बुलडाणा : संपूर्ण राज्यात गुटखा बंदी असतानाही जिल्ह्यात सर्वत्र पान टपऱ्यांवर गुटखा मिळत असल्याचे चित्र बुलडाणा शहरात दिसून येत आहे. तेव्हा जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरात गुटखा बंदीचा फज्जा उडाला असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे विकला जाणारा गुटखा हा चढ्या भावाने विकल्या जात असून, अनेकजण यामधून मालामाल होत असल्याचे दिसून येत आहे.
रस्त्यावर पार्किंग
बुलडाणा : बुलडाणा शहरात वाहतुकीचे नियम सर्रास तोडले जात आहेत. यासोबतच शहरातील प्रतिष्ठाणासमोर कुठेही पार्किंग झोन उपलब्ध नसून, शहरात रस्त्यावरच पार्किंग केले जात आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तर दुसरीकडे क्षुल्लक कारणावरून वादही उद्भवण्याचे प्रसंग शहरात घडले आहेत. तेव्हा संबंधित विभागाने शहरातील पार्किंगच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद
धाड : बुलडाणा तालुक्यात मागील तीन ते चार दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी सुखावले आहेत. आता खरिपाच्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार असल्याची शक्यता आहे. असे जरी असले तरी मात्र, अद्यापही नदी-नाले आणि प्रकल्प कोरडे असून, रब्बी हंगामाची शाश्वती धूसर आहे.
पाण्याचा अपव्यय
बुलडाणा : बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन जागोजागी फुटली असून, यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे नगरपालिकेने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. असे झाल्यास शहरातील प्रत्येक नळधारकांना पाणी मिळण्यास मदत होणार आहे. तरी येत्या काही दिवसांत पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी होत आहे.