महामार्गावर खड्डे की खड्ड्यात महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:41 AM2021-09-08T04:41:25+5:302021-09-08T04:41:25+5:30
दुसरबीड या गावांमध्ये जाणारा महामार्ग गावाच्या मधून गेल्यामुळे याठिकाणी दवाखाने, बाजारात येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होते. परिसरातील १५ ते ...
दुसरबीड या गावांमध्ये जाणारा महामार्ग गावाच्या मधून गेल्यामुळे याठिकाणी दवाखाने, बाजारात येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होते. परिसरातील १५ ते २० खेड्यांमधील लोक या ठिकाणी रोज आपल्या कामानिमित्त येत असता. त्यामुळे हा रस्ता वर्दळीचा असून त्यातल्या त्यात समृद्धी महामार्गाची वाहनेसुद्धा या ठिकाणाहून ये-जा करतात. या रस्त्यावर एवढी वर्दळ असताना हा रस्ता जागोजागी खड्डे पडून निकामी झाला आहे. सध्या पावसाळी दिवस असल्यामुळे खड्ड्यामध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे रोडवर वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी या मार्गावर नेहमी अपघात होतात.
खड्डे ठरताहेत जीवघेणे
दुसरबीड परिसरातील खड्डे जीवघेणे ठरत आहेत. परिसरातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. मात्र याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही. या रस्त्यावरून वाहतूक कोंडीचाही प्रश्न नित्याचाच झाला आहे. त्यामुळे पायी चालणाऱ्यांनाही हा रस्ता म्हणजे डोकेदुखी ठरत आहे.