जांभरुण रस्त्यावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:37 AM2021-08-27T04:37:52+5:302021-08-27T04:37:52+5:30

रस्त्यावर पार्किंग बुलडाणा : बुलडाणा शहरात वाहतुकीचे नियम सर्रास तोडले जात आहेत. यासोबतच शहरातील प्रतिष्ठानासमोर कुठेही पार्किंग झोन उपलब्ध ...

Pits on purple road | जांभरुण रस्त्यावर खड्डे

जांभरुण रस्त्यावर खड्डे

Next

रस्त्यावर पार्किंग

बुलडाणा : बुलडाणा शहरात वाहतुकीचे नियम सर्रास तोडले जात आहेत. यासोबतच शहरातील प्रतिष्ठानासमोर कुठेही पार्किंग झोन उपलब्ध नसून, शहरात रस्त्यावरच पार्किंग केली जात आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तर दुसरीकडे क्षुल्लक कारणावरून वादही उदभविण्याचे प्रसंग शहरात घडले आहेत. तेव्हा संबंधित विभागाने शहरातील पार्किंगच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

पाण्याचा अपव्यय

बुलडाणा :बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन जागोजागी फुटली असून, यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे नगरपालिकेने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. असे झाल्यास शहरातील प्रत्येक नळधारकांना पाणी मिळण्यास मदत होणार आहे. तरी येत्या काही दिवसांत पाईप लाईन दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी होत आहे.

Web Title: Pits on purple road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.