रेती चोरीस आळा घालण्यासाठी चोरट्या रस्त्यावर जेसीबीने खड्डे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:17 AM2018-04-24T01:17:58+5:302018-04-24T01:17:58+5:30
अंढेरा : रेती घाटावर रात्री गस्त घालणे, नाक्यावर महसूल अधिकार्यांची नियुक्ती करणे, भरारी पथक कार्यरत करूनही खडकपूर्णा नदी पात्रातील रेती मोठय़ा प्रमाणात चोरीला जात आहे. त्यावर उपाययोजना म्हणून देऊळगाव राजा तहसील प्रशासनाने दिग्रस येथील रेती घाटावरील चोरट्या मार्गावर जेसीबीने मोठमोठे खड्डे खोदून रेती चोरीला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदी पात्रातील रेती संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे रेती चोरण्याचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणात आहे. अशा रेती चोरट्यांना पायबंद घालण्यासाठी रेती घाटावर रात्री गस्त घालणे, नाक्यावर महसूल अधिकार्यांची नियुक्ती करणे, भरारी पथक कार्यरत करूनही रेतीची चोरटी वाहतूक सुरूच होती. याबाबतच्या कारवाई दरम्यान महसूल विभागातील कर्मचार्यांच्या अंगावर रेतीची गाडी टाकण्याची घटनाही घडली होती. या प्रकाराला आळा बसावा, रेतीची चोरटी वाहतूक होऊ नये म्हणून देऊळगाव राजाचे तहसीलदार दीपक बाजड यांनी पुढाकार घेऊन २३ एप्रिल रोजी डिग्रस येथील सर्वांत मोठय़ा रेतीघाटावर चक्क जेसीबीने मोठ-मोठाले खड्डे खोदण्याचा कार्यक्रम पूर्ण केला. चोरट्या रेती वाहतुकीवर आळा घालण्यासाठी ेशेवटचा उपाय म्हणून खड्डे खोदण्यात आले असून, या उपक्रमाचे परिसरातील ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.