शेगाव तालुक्यातील दुष्काळी स्थितीबाबत नियोजन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 01:30 PM2019-05-21T13:30:25+5:302019-05-21T13:30:35+5:30
शेगाव: तालुक्यातील पाणी प्रश्न बिकट असून ग्रामीण जनतेची गैरसोय होवू त्यांना पुरेशा पाणी देण्याचे दृष्टीने ग्रामपंचायतीचे आलेल्या प्रस्तावावर तात्काळ उपाययोजना करण्यात येईल ,अशी ग्वाही तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिली.
- अनिल उंबरकार
लोकमत न्युज नेटवर्क
शेगाव: तालुक्यातील पाणी प्रश्न बिकट असून ग्रामीण जनतेची गैरसोय होवू त्यांना पुरेशा पाणी देण्याचे दृष्टीने ग्रामपंचायतीचे आलेल्या प्रस्तावावर तात्काळ उपाययोजना करण्यात येईल ,अशी ग्वाही तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिली.
दुष्काळी परिस्थिती मुळे तालुक्यात अनेक गावांत निर्माण झालेल्या भीषण पाणी व चारा टंचाई निवारणार्थ तहसिलदार शिल्पा बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक पं स सभागृहात सोमवारी सरपंच व ग्रामसेवकांकडून गावनिहाय आढावा घेण्यासाठी महत्वपूर्ण सभा पार पडली.
याप्रसंगी नायब तहसीलदार डॉ सागर भागवत,पं स सभापती विठ्ठलराव पाटील,जि प सदस्य राजाभाऊ भोजने,पांडुरंग सावरकर,पं स उपसभापती सुखदेवराव सोनोने, सदस्य इनायतउल्ला खान, विठ्ठल सोनटक्के,निळकंठ पाटील,पांडुरंग शेजोळे,बीडीओ पी आर वाघ, मंडळ अधिकारी अशोक कडूकार यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीमध्ये उपस्थित ग्रा पं सरपंच व ग्रामसेवक यांचेकडून गावनिहाय पाणी व चारा टंचाईचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
चारा छावण्यासाठी मागितले प्रस्ताव.....
शेगाव तालुक्यातील नागझरी, जुई,हिंगणे वैजनाथ,तोडा कसबा, वरूड, गव्हाण, तिंत्रव, भोनगाव, माटरगाव व अन्य गावात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून बैठकीत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
शेगाव तालुक्यात एकूण 66 गावे असून सध्यस्थितीत शासनाकडून तालुक्यातील 24 गावात 27 टॅंकर द्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तर 32 गावात 37 ठिकाणच्या विहिरी अधिग्रहीत करून ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर याव्यतिरिक्त आणखी 5ते6गावात टॅकर द्वारे पाणी देण्यासाठी प्रशासन विचारधिन असल्याची माहिती यावेळी पं. स. च्या पाणी पुरवठा विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक विजय पवार यांनी दिली.