पालिकेतर्फे वृक्षांना ट्री गार्ड लावणे सुरू!

By Admin | Published: August 4, 2016 01:09 AM2016-08-04T01:09:46+5:302016-08-04T01:09:46+5:30

लोकमत वृत्ताची दखल; लावलेली रोपे झाली होती बेपत्ता.

Plant begins to plant a tree guard for trees! | पालिकेतर्फे वृक्षांना ट्री गार्ड लावणे सुरू!

पालिकेतर्फे वृक्षांना ट्री गार्ड लावणे सुरू!

googlenewsNext

बुलडाणा, दि. ३ : स्थानिक नगरपालिकेकतर्फे शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी ट्री गार्ड नसल्यामुळे अनेक ठिकाणची रोपे बेपत्ता झाली होती. याबाबत लोकमतने २७ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत पालिकेतर्फे वृक्षाला ट्री गार्ड लावणे सुरू करण्यात आले आहे.
शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवड योजनेत विविध सेवाभावी संस्था, संघटनांनी मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड केली. नगर पालिकेने या मोहिमेत मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी पालिका प्रशासनाने ६२५ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र विविध संघटनांनी यात सहभाग घेतल्याने १ हजार २९३ वृक्ष लागवड म्हणजे जवळपास २00 टक्के वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले. मात्र या वृक्षाच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे जांभरूण रस्त्यावर लावण्यात आलेले वृक्ष पूर्णपणे नष्ट झाली. तर काही झाडे मरणासन्न अवस्थेत होती. याबाबत लोकमतने २७ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले होते.

Web Title: Plant begins to plant a tree guard for trees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.