एडेड हायस्कूलमध्ये वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:52+5:302021-06-06T04:25:52+5:30
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू तसेच पर्यावरणाला किती महत्त्व आहे, हे मानवाला समजले आहे़ स्वच्छ पर्यावरण प्रत्येक प्राण्यांच्या ...
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू तसेच पर्यावरणाला किती महत्त्व आहे, हे मानवाला समजले आहे़ स्वच्छ पर्यावरण प्रत्येक प्राण्यांच्या जीवनासाठी आवश्यक आहे. ही गोष्ट कित्येक वर्षांपासून आमच्या पूर्वजांनी समजून ते स्वीकारले आहे. मात्र वेळेनुसार विकासाच्या अति महत्त्वाकांक्षासाठी मानवजातीचे पर्यावरणाचा विनाश केला आहे. याचे परिणाम प्राणवायूच्या रुपात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत दिसले. आता आम्हाला स्वच्छ पर्यावरणात निसर्गासोबत राहू. या अनुषंगाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रीय हरित सेनेतर्फे शाळेचे अध्यक्ष डॉ. श्री.प्रमोद देशपांडे, सचिव ॲड. बाळासाहेब कविमंडन यांच्या हस्ते तसेच सदस्य ॲड रामानंद कविमंडन, प्राचार्य आर.ओ.पाटील,तोमर यांच्या उपस्थितीत कडुनिंबाचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हरित सेना प्रमुख. आर.एन.जाधव यांनी केले होते.