बार्टीतर्फे वृक्षारोपण पंधरवड्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:26 AM2021-06-06T04:26:02+5:302021-06-06T04:26:02+5:30
चार गावांसाठी विंधन विहीर मंजूर लोणार : तालुक्यातील चार गावांसाठी विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शिवणी पिसा, ...
चार गावांसाठी विंधन विहीर मंजूर
लोणार : तालुक्यातील चार गावांसाठी विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शिवणी पिसा, नांद्रा, सुलतानपूर व गोवर्धननगर या गावांचा समावेश आहे. विंधन विहिरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे.
दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न
बुलडाणा : सर्वत्र पाणीटंचाई जाणवत असताना बुलडाणा शहरात मात्र पिवळसर असे दूषित पाणीपुरवठा होत आहे. पालिकेच्या नळयोजनेद्वारे सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा रंग बदलल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बुलडाणा शहराला येळगाव धरणावरून पाणीपुरवठा करण्यात येतो.
बालसंस्कार शिबिराला फटका
मेहकर : तालुक्यातील विविध बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या बालसंस्कार शिबिराला यंदा कोरोनाचा फटका बसला आहे. शिबिराच्या माध्यमातून संस्कृत, मृदंग यासह विविध धार्मिक कार्य महत्त्वपूर्ण पद्धतीने पार पडले जाते. एक महिना बाल सुसंस्कार शिबिर राबविण्यात येते.
दिव्यांग तपासणी शिबिर रद्द
बुलडाणा : जिल्हा रुग्णालय येथे नियमितपणे दर महिन्याला एक दिवस होणारे दिव्यांग तपासणी शिबिर कोरोनामुळे वारंवार रद्द करावे लागत आहे. अस्थिव्यंग, नेत्र, मनोरुग्ण, मतिमंद, कान, नाक, घसा संबंधित दिव्यांग तपासणी या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येते.
रस्त्यांचे भाग्य केव्हा उजळणार
देऊळगाव राजा : तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे केव्हा भाग्य उजळणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने मंजूर केलेल्या निधीतून जिल्हा परिषदेच्या रस्त्यांचे डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून लवकरच सुरू करणार असल्याची माहिती आहे. परंतु अद्याप ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे.
आरटीई प्रवेशासाठी दिरंगाई
सिंदखेड राजा : शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे यावर्षी आरटीई प्रवेशाचे नियोजन हुकले आहे. शालेय व्यवस्थापनावर शिक्षण विभागाचा कोणताही अंकुश नसल्याने प्रवेशाची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी विलंब होत असल्याने पालक चिंतित आहेत.
विद्युत तारांमध्ये येणाऱ्या वृक्षांची छाटणी
हिवरा आश्रम : ग्रामीण भागात महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यासाठी विद्युत तारांच्या मध्ये येणाऱ्या वृक्षांच्या फांद्या तोडण्यात येत आहेत. परंतु महावितरणच्या या मान्सूनपूर्व कामामुळे परिसरातील विद्युत पुरवठा वांरवार खंडित करण्यात येत आहे.
स्मार्ट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे
बुलडाणा : कॅशलेस व्यवहाराच्या स्मार्ट कार्डसाठी प्रवाशांची नोंदणी करण्याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक आगाराला संगणकाचे वितरण करण्यात आले आहे. कॅशलेस व्यवहाराच्या या कामाची व नोंदणीची जबाबदारी प्रत्येक ठिकाणी सोपविण्यात आली होती. परंतु अद्यापपर्यंत अनेक लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड मिळालेले नाही.
दोन दिवसात ५० पॉझिटिव्ह
बुलडाणा : तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचे ४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर शनिवारी १० रुग्ण सापडले. दोन दिवसांत ५० पॉझिटिव्ह सापडले आहेत. सर्वच तालुक्यात आता कोरोनाबाधितांचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. परंतु प्रत्येकाने कोरोनाची त्रिसूत्री पाळावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी
सुलतानपूर : शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस पडेपर्यंत पेरणी करण्याची घाई करू नये. बियाण्याला शिफारशीनुसार बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. जेणेकरून पीक जोमदार वाढीस लागेल, असे मत शेतीशाळा तज्ज्ञांकडून व्यक्त केले. कृषी विभागाकडून गावोगावी खरीपपूर्व नियोजनाच्या ऑनलाइन सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.