लाखो रोपट्यांची लागवड!
By Admin | Published: July 2, 2016 01:12 AM2016-07-02T01:12:30+5:302016-07-02T01:12:30+5:30
वन महोत्सवार्तंगत वृक्षारोपणासाठी सरसावले हजारो हात.
बुलडाणा : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्यावतीने १ ते ७ जुलैपयर्ंत दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. यानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी १ जुलै रोजी लाखो वृक्ष लावण्यात आले.
समिती परिसरात मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, गटविकास अधिकारी लोखंडे यांच्यासमवेत वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी यांनी वन विभागाच्या लाकूड आगारात वृक्षारोपण केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजीवकुमार बावीस्कर, अपर पोलीस अधीक्षक श्वेता खेडेकर, उपवनसंरक्षक बी.टी भगत, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक एस. आर. मोरे, सरपंच आडवे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण केले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच
कृउबासच्या परिसरातही जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी वृक्षारोपण केले. यावेळी सभापती जालींधर बुधवत, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदींसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र हरित व समृद्ध महाराष्ट्र करण्यासाठी १ ते ७ जुलै हा वन महोत्सव साजरा करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. या आवाहनाला घाटाखालील विविध तालुक्यांत ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वन महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था आणि शासकीय कार्यालयाच्यावतीने रोपट्यांची लागवड करण्यात आली.